शेवगाव प्रतिनिधी दि. १५ : भारतातील सर्वात कमी मानधनावर काम करणारा घटक म्हणजे शालेय पोषण आहार योजनेतील कर्मचारी होय. या कर्मचारी वर्गाच्या अनेक समस्या शासन स्तरावर गेल्या २० वर्षापासून प्रलंबित आहे. या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना राज्य पातळीवर कार्यरत असून त्यांची शेवगाव तालुका बैठक रविवारी शेवगाव येथे संपन्न झाली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र विधाते हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राज्य समन्वयक सुभाष सोनवणे आणि उत्तम गायकवाड हे होते. या बैठकीत सभासदांच्या विविध समस्या विषयी चर्चा करण्यात आली. पगारवाढी संदर्भात संघटनेचे ध्येय धोरणे सांगण्यात आली. शासनाने लवकरात लवकर पगार वाढ न केल्यास वेळप्रसंगी नाईलाजाने न्यायलयात सुद्धा जाण्याचे ठरले.
सभासदांच्या विविध समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ३ ऑगस्ट २०२४ रोजी शेवगाव तालुकास्तरीय मोर्चा तहसील कार्यालायावर काढण्याचे ठरले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र विधाते प्रमुख अतिथी उत्तम गायकवाड व सुभाष सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीचे प्रास्तविक तालुकाध्यक्ष शिवकन्या गिरमे यांनी केले तर सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष सिंधुताई भुसारे यांनी केले. तालुका संघटक एकनाथ कोरडे यांनी आभार व्यक्त केले. तालुक्यातील सभासद बैठकीसाठी मोठ्या संख्येने हजर होते.