लोकसहभागातून शास्त्रीनगर जिल्हा परिषद शाळेत घेतला बोअर

शेवगाव प्रतिनिधी, दि . १६ : शेवगावातील पाणी टंचाई लक्षात घेऊन येथील शास्त्रीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती तसेच पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने प्रयत्न पूर्वक लोकसहभाग मिळवून शाळेच्या प्रांगणात  बोअर घेण्याची व्यवस्था केली. गटविकास अधिकारी राजेश कदम यांचे शुभहस्ते भूमि पूजन करून बोअर घेण्यात आला. हा परिसर खडकाचा असूनही १३० फुटावर चांगले पाणी लागले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णुपंत घनवट व सर्व सदस्यांचे  चांगल योगदान लाभले. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती कोलते, शिक्षण विस्तार अधिकारी  शैलजा राऊळ, केंद्रप्रमुख  रविंद्र कडू पाटील, मुख्याध्यापिका सुभद्रा वांढेकर, सुरेश म्हस्के सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते.