दिव्यांग व्यक्तीसह त्याच्या मुलावर विनयंभगाचा गुन्हा दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : शेअर मार्केटमध्ये २० लाखांची फसवणुक झालेल्या दिव्यांग व्यक्ती व त्याच्या मुलावर विनयंभगाचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिका-यांवर कारवाई होईल यासाठी आपण जातीने लक्ष घालून न्याय मिळवून देऊ असा दिलासा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी शेवगाव येथील अपंग गणेश हनवते यांना दिला.

  आज गुरुवारी (दि १८) आमदार कडू छत्रपती संभाजी नगर येथे असतांना प्रहार संघटनेच्या राज्य कार्य कारिणी सदस्या लक्ष्मी देशमुख, दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र पोकळे, उत्तरनगर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांच्या शिष्टमंडळाने या प्रकरणाची इत्यंभूत व्यथा आ. कडू यांचे पुढे सविस्तर निवेदन देऊन मांडली यावेळी आ.कडू  यांनी स्पष्ट शब्दात निषेध व्यक्त करत यासंदर्भात न्याय मिळवून देवू असे आश्वासन दिले.

गणेश हनवते हे दोन्ही पायाने अपंग असून त्यांच्या मुलाच्या डोळयाची शस्त्रक्रीया झाल्याने तो घरात पडून आहे. तरीसुध्दा या दोघांनी कंपाऊंडवरून उडी मारत घरात प्रवेश करुन विनयंभग केला अशी फिर्याद दाखल केली आहे.