ॲड. प्रताप ढाकणे यांना विधानसभेवर पाठवा – खासदार निलेश लंके

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : कार्यकर्त्यांमध्ये जेव्हा नवचैतन्य निर्माण होते तेव्हा कुठलीही गोष्ट अशक्य नसते. संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा चालवणाऱ्या ॲड. प्रताप ढाकणे यांनी आपले आयुष्य जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना विधानसभेवर पाठवा. असे आवाहन अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस ॲड. प्रताप ढाकणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमीत्  येथील खंडोबानगर येथे गायक मिलिंद शिंदे यांच्या गायणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजीत कार्यक्रमामध्ये खासदार लंके बोलत होते. याववेळी प्रभावती ढाकणे, ॲड. दिनकर पालवे, रामदास गोल्हार, शिवशंकर राजळे, हरीष भारदे, ऋषिकेश ढाकणे,वजीर पठाण,एजाज काझी, राहुल मगरे,माधव काटे आदी उपस्थित होते.

यावेळी ढाकणे म्हणाले की, भविष्यात मला काय मिळेल, न मिळेल ते मला माहित नाही, परंतु मला माझ्या वडिलांसारखा आधार देणारा लहान भाऊ खासादर निलेश लंकेच्या रूपाने मिळाला होता. राजकारणात माझे अनेकांशी संबंध आले आणि गेले. मात्र अलीकडच्या काळात राजकारणात तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करणारा, मार्गदर्शन करणारा, बळ देणारा मित्र मिळणे दुर्मिळ झाले आहेत.

सरपंचापासून खासदार झालेल्या निलेश लंके यांच्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता आजही टिकून आहे माझे वडील बबनराव ढाकणे यांच्या विचारांचा वारसा घेऊन मी लढत आहे. मला शेवगाव पाथर्डीचा आमदार होण्याची संधी दिली तर मी मतदार संघाचा कायापालट करून दाखवील. कार्यक्रमाचे प्रास्तविक माधव काटे यांनी केले. ऋषिकेश ढाकणे यांनी आभार मानले.