शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : गुरुपौर्णिमा उत्सवा निमीत्त कै.कांताभाऊ फडके चँरीटेबल ट्रस्ट शेवगाव यांच्या वतीने शेवगाव ते श्री क्षेत्र शिर्डी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. हा पायी दिंडी सोहळा गेल्या १३ वर्षापासून संपन्न होत आहे. या दिंडीचे प्रस्थान शेवगावातील साईनगर येथील साई मंदिरातून गुरुवार दि .१८ रोजी तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या हस्ते आरती करून करण्यात आले.
यावेळी दिंडीमध्ये तालुक्यातील युवक मोठया संख्येने सहभागी झाले. दिंडी कुकाणा, भेंडा, नेवासा फाटा, नेवासा, टाकळीभान, श्रीरामपूर, वाकडी, गणेशनगर, एकरुखे मार्गे श्री क्षेत्र शिर्डी येथे शनिवार दि .२० ला रात्री पोहचणार आहे. रविवारी सकाळी साई दर्शनानंतर भोजन घेऊन पालखी शेवगावकडे प्रस्थान करील.
ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष माजी नगर सेवक सागर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर कापरे, संभाजी सागडे, माऊली फटांगरे, सुनिल गांगे, आराश लबडे, विष्णू घनवटे आदींनी उत्तम नियोजन केले. तर साई मंदिर समिती,संत नागेबाबा प्रतिष्ठाण भेंडा, साई सेवक परिवार, श्रीराम मित्र मंडळ, पांडुरंग कावरे, पप्पुशेठ जावळे, प्रविण मोकाने, चव्हाण परिवार, वसंत गवादे,वैभव गवारे, रितेश देहाडराय, विजय देशमुख आदींनी सहकार्य केले.