कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : कोपरगाव वकील संघाची नुकतीच निवडणुक प्रक्रिया पार पडली यात अॅड. अशोकराव वहाडणे हे मोठया मताधिक्याने निवडुण आल्यााने अॅॅड. वहाडणे यांची कोपरगाव वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, शनिवार दि. २० जुलै २०२० रोजी कोपरगाव वकील संघाची निवडणुक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी अॅड. अशोकराव वहाडणे, अॅड. गौरव गुरसळ, अॅड. दिपक पोळ व अॅड. रत्नप्रभा भोंगळे यांचे अर्ज आल्याने केवळ अध्यक्ष पदासाठी ही निवडणुक घेण्यात आली.
या निवडणुकीत एकुण २०० मतदारांपैकी १७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात अॅड. अशोकराव वहाडणे – ११२ मत, अॅड. गौरव गुरसळ – ४८ मत, अॅड. दिपक पोळ – १० मत, अॅड. रत्नप्रभा भोंगळे यांना ४ मत असे मतदान झाले, तर १ मत बाद झाले.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन माजी अध्यक्ष अॅड. मनोहर येवले यांचेसह माजी उपाध्यक्ष अॅड. शरद गव्हरणे, माजी महिला अध्यक्ष अॅड. ज्योती भुसे यांनी काम पाहीले. सर्व उमेदवरामध्ये अॅड. अशोकराव वहाडणे यांना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांना विजयी घोशित केले.
दरम्यान उपाध्यक्ष पदासाठी अॅड. रमेश चंद्रभान गव्हाणे, महिला उपाध्यक्ष पदासाठी अॅड. स्वाती मैले, सचिव पदासाठी अॅड. राहुल कैलास चव्हाण, सह सचिव पदासाठी अॅड. प्रताप अशोकराव निंबाळकर तर खजिनदार पासाठी अॅड. दिपक सुरेश पवार यांचे एकमेव अर्ज आल्याने आदींची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी कोपरगाव वकील संघाच्यावतीने अॅड. अषोकराव वहाडणे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना वहाडणे म्हणाले की, या वकील संघामध्ये अनेक कामे करण्याची मला संधी आहे. तालुका कोर्टाच्या नवीन इमारतीचे काम, सहकार कोर्टाच्या इमातीचे काम तसेच ज्युनिअर वकीलांच्या विविध प्रष्न सोडविण्यासाठी प्रधान्याने काम करणार असल्याचे वहाडणे यांनी नमुद केले. वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह कोपरगाव वकील संघाचे सिनियर, ज्युनिअर वकील सदस्य उपस्थित होते.