दारणा धरणात ७५ टक्के पाणीसाठा, नाशिक धरण परिसरात मुसळधार पाऊस

 कोपरगाव परातीनिधी, दि. २४ : नगर-नाशिकसह मराठवाड्यातील नागरीकांची तहान भागवणाऱ्या दारणा धरण परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने अवघ्या आठ दिवसांत दारणा धरणात तब्बल ७५ टक्के पाणी साठा झाल्याने येत्या काही दिवसांत हे धरण शंभर टक्के भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

 नाशिक धरण परिसरात गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने नवीन पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक धरणांच्या पाण्याची पातळी कमालीची वाढत आहे. विशेषतः दारणा धरणा परिसरात १ जून पासुन ते आत्ता पर्यंत ४६८ मिली मिटर पाऊस पडल्याने दारणाच्या पाण्यात वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहीला तर लवकरच हे धरण शंभर टक्के भरण्याची शक्यात असल्याने नाशिक पाटबंधारे विभागाने दारणा धरणातून  नांदूरमधमेश्वर  बंधाऱ्यात  काल पासुन १ हजार ८७४ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील सध्याचा  पाणी साठी  पुढील प्रमाणे 

दारणा – ७५.८१ टक्के, भावली – १०० टक्के, भाम – ७९ .३४ टक्के, कडवा – ६३.४५ टक्के, गंगापूर – ४२.४५, वालदेवी – ३५.६६ टक्के,वाकी – २४.०८ टक्के, कश्यपी – १७.२२ टक्के , पालखेड – १४.२४ टक्के, आळंदी – ७.२३ टक्के,  भरले असून भोजापूर, ओझरखेड, तिसगाव व पुणेगाव हि छोटी धरणी अजुनही कोरडी आहेत.

 नगर -नाशिक विरुद्ध मराठवाडा येथील नागरीकांचा संघर्ष कायम पाण्यावरून होत आहे. जो पर्यंत नाशिक परिसरातील धरणांमध्ये शंभर टक्के पाणी भरत नाही तो पर्यंत संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असते. कधी एकदा नगर नाशिक धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा होईल आणि मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा वाढेल याकडे राज्याचे लक्ष लागलेले असते.   गेल्या आठ दिवसांपासून  पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठा वाढल्याने नगर-नाशिकसह मराठवाड्यातील नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दरम्यान गेल्या वर्षा पेक्षा या वर्षी पावसाने दडी मारल्याने धरणाची पातळी खालावली आहे. नाशिक परिसरातील धरणे  गेल्यावर्षी २४जुलै पर्यंत सरासरी ४६.८२ टक्के भरली होती. माञ या वर्षी पाऊसमान कमी झाल्याने सर्व धरणातील एकुण पाणीसाठा सरासरी केवळ ३३.८२ टक्के आहे. काही धरणामध्ये आजून नवीन पाण्याची आवक झाली नसल्याने तळ गाठला आहे. माञ दारणा धरणांमध्ये नविन पाण्याची आवक वाढल्याने सध्यातरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिळण्याची शक्यता आहे.