दहिगांवने ते शहरटाकळी रस्त्याची दुरावस्था

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : तालुक्याची राजधानी म्हणून लौकिक असलेल्या दहिगावने ते  शहरटाकळी  रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यांत जागो जागी झालेल्या खड्यात चिखलाची डबकी झाली असल्याने  पायी चालणे अवघड झाले असून अनेक वाहनाचे अपघात वाढले आहेत. ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

या रस्त्याकरिता अनेक वेळा आमदार, ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले, परंतु या रस्त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी कोणताही उपयोजना करण्यात आली नाही.

तालुक्याची राजधानी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या दहिगावंने कडे जाणाऱ्या या मार्गावर शहरटाकळी, देवी निमगाव सारखी अध्यात्मिक व राजकीय दृष्ट्याओळख असलेली मोठी गावे आहेत.  बस स्टॅडवरील प्रवाशांना तर कायमस्वरूपी खराब रस्त्याचा सामना करावा लागत आहे. दहिगावंनेला मठाचीवाडी, मजलेशहर आदी परिसरातील बहुतांशी शाळेतील मुले मुलींना याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते.  यात बालकांचे मोठे हाल होतात.