कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : गोदावरी उजव्या कॅनॉलवर उजनी उपसा जलसिंचन योजना टप्पा क्रमांक एक मधून पाझर तलाव भरून घ्यावे यासाठी मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दुष्काळी भागाला फायदा होण्यासाठी सदर योजना आहे. धोंडेवाडी, अंजनापुर, जवळके, काकडी, बहादराबाद, रांजणगाव, शहापूरसह परिसराला पाण्याची अडचण भासू नये यासाठी योजना तांत्रिक बाबी पुढे न करता पाझर तलाव भरले जावे यासाठी कोल्हे यांचा नेहमी प्रयत्न असतो अशी प्रतिक्रिया प्रगतिशील शेतकरी रावसाहेब(बंडूभाऊ) थोरात यांनी दिली आहे.
बाबुराव थोरात यांची पिपाणी फक्त उजनी बद्दल कोणी चांगले काही केले की, विरोध करायला काळे वाजवतात. प्रत्येक वेळी टीका करण्यात वेळ घालवण्या ऐवजी आमदार काळे यांनी काम करणे अपेक्षित होते. वास्तविक पाहता लोकांना संभ्रमित करने, अर्धवट माहिती देणे यावर त्यांचा भर आहे. स्वतः मात्र काही करायचे नाही आणि दुसऱ्यांनी काम केले तर त्यात प्यादे पुढे करून बेताल बोलायचे यावर काळे यांचे राजकारण चालते.
जर टप्पा दोन ट्रान्सफॉर्मर चोरी गेल्या अभावी बंद आहे असे थोरात म्हणतात तर या योजनेचा मेंटेंनस बाबुराव थोरात यांच्याकडे असून एकतर नेतेगिरी करा किंवा ठेकेदारी करा. ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला असे आपण म्हणता तर त्याला जबाबदार कोण ? आणि आपण तक्रार का दाखल केली नाही असे संशयास्पद प्रश्न उभे राहतात.
सद्यस्थितीत टप्पा दोन सुरू नाही तोवर टप्पा एक सुरू ठेवत पाणी उचलता येऊ शकते. वस्तुस्थिती लक्षात आणून देण्यासाठी उजनी उपसा जलसिंचन योजनेचे घुलेवाडी कार्यालयाचे लव्हाट साहेब व पाटबंधारे खात्याचे भंडारी यांच्याशी स्नेहलताताई कोल्हे यांनी भ्रमणध्वनिवर संपर्क करून टप्पा एक सुरू करून जवळके आणि धोंडेवाडी, बहादराबाद आणि शहापूरचे तलाव भरून देण्याबाबत चर्चा केली.यावेळी ग्रामस्थ आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या योजनेचे विवेक कोल्हे यांनी वैयक्तिक वीजबिल भरले असताना केवळ श्रेय घेण्यासाठी आयते बटन दाबणारे आमदार काळे मात्र स्वतः निष्क्रिय आहेत. कोल्हे आमच्या प्रश्नांवर आवाज उठवत असतात. जर आमचा प्रश्न सुटला तर तुमच्या पोटात का दुखते असा सवाल काळे गटाला केला आहे.
पोहेगाव रस्त्याचे जनतेचे हक्काचे दहा कोटी मातीमोल करून ठेकेदार पूरक धोरण घेऊन जनतेचे हाल करणाऱ्या आशुतोष काळे यांना आमच्या भागावर बोलण्याचा आता नैतिक अधिकार नाही.