रासपच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्याचा स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा

शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : राष्ट्रीय समाज पक्षाची शेवगाव पाथर्डी विधानसभा आढावा बैठक शनिवारी ( दि. ३) येथील साई पूजा हाॅटेलमध्ये पक्षाचे प्रदेश सेक्रेटरी तथा  शेवगाव पाथर्डी मतदारसंघ निरीक्षक डॉ. प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

यावेळी झालेल्या बैठकीत आगामी काळात  येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत डॉ. पाटील यांनी कार्यकर्त्याच्या भावना समजून घेत पक्ष संघटना मजबुत करणे, उमेदवार निवड, कार्यकर्त्यांना पाठबळ, सामान्य माणुस व कार्यकर्ता यांच्यात समन्वय, तरुणांचा राजकीय सहभाग इत्यादी विषयांवर चर्चा व मार्गदर्शन  केले.

कार्यकर्त्यांनी बैठकीत रासपने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवावी. अशा भावना आग्रही स्वरूपात व्यक्त केल्या. तसेच अंतिम निर्णय हा पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचेवर सोपविण्यात आला. रा स पचे निरीक्षक तथा प्रदेश सचिव डॉ. पाटील, पाथर्डी विधानसभा प्रमुख शहाजी कोरडकर, जिल्हाध्यक्ष आत्माराम कुंडकर, लोकसभा अध्यक्ष, गोवर्धन शेळके – शेवगाव तालुकाध्यक्ष-, अंकुश बोडे, पाथर्डीतालुकाध्यक्ष, सुनिल नजन जिल्हा उपाध्यक्ष, तसेच दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.