संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य गंगा गोदावरी महाआरती संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी गंगा गोदावरी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय देखणा सोहळा कोपरगाव गोदावरी घाट येथे पाहण्यासाठी आणि गंगा गोदामातेचे पूजन करण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.
फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि आकर्षक विद्युत रोषणाईच्या वातावरणात हर हर गंगे आणि हर हर महादेवांच्या जयघोषात अवघा गोदाकाठ दुमदुमला होता.युवानेते विवेक कोल्हे आणि सौ.रेणुकाताई कोल्हे यांनी गोदावरी मातेची ओटी भरून शिवशंकर महादेवाचे पूजन केले. नेहमीच संस्कृती आणि परंपरा जतन करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम घेऊन कोपरगावकरांचे मन जिंकत असते. यामुळे जागवूया ज्योत माणुसकीची हा विचार घेऊन समाजात कार्यरत असणारे प्रतिष्ठान म्हणून आवर्जून उल्लेख केला जातो. सामाजिक जाणीव जपण्याचे काम सर्व युवासेवकांच्या मेहनतीतून केले जाते ज्यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण होतो आहे.
गंगा आरती सुरू असताना गोदापात्रात अतिशय लक्षवेधी असणाऱ्या बोटीतून फटाके अवकाशात झेपावत आतिषबाजीने गोदावरी परिसरासह कोपरगाव शहरात लखलखाट करत होते.
भगवान श्री शंकर महादेवांची आराधना करण्याचा हा पवित्र श्रावण महिना आहे. मागील वर्षी शेवटच्या श्रावणी सोमवारी आपण हा सोहळा घेतला होता मात्र या वर्षी प्रत्येक सोमवारी गंगा आरती व्हावी असे आयोजन भाविकांच्या आग्रहास्तव केलेले आहे. काठोकाठ दुथडी भरून वाहणारी गोदामाता अशीच अखंड वाहती रहावी आणि सर्वत्र सुजलाम सुफलाम करावे. श्री सदगुरू साईबाबा, संत जनार्दन स्वामी,संत जंगलीदास महाराज अशा अनेक संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन आहे.
या वर्षी सुरू झालेला श्रावण सोमवारने सुरू झाला आणि महिना पूर्ण देखील सोमवारने होतो आहे, हा दुर्मिळ योग आहे. या पुढील प्रत्येक सोमवारी विशेष आकर्षण असणारे भजन आणि देखावे सोहळे आपण आयोजित केले आहे तरीही साधू संतांच्या उपस्थितीत आगामी होणाऱ्या गंगा आरतीसाठी हजारोंच्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन विवेकभैय्या कोल्हे यांनी यावेळी केले आहे. यावेळी नागरिक, शिवभक्त, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.