संजीवनीच्या संकेत दवंगेला १६ लाखांचे वार्षिक पॅकेज

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ६ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने जस्पे टेक्नॉलॉजिज प्रा. लि., बंगळुरू या तंत्रज्ञ समृध्द कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. यात कॉम्प्युटर इंजिनिअरींग व इन्फर्मेशन टेक्निॉलॉजी विभागाच्या तीन अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली आहे.

यात कंपनीने संकेत श्रीराम दवंगे यास सुरूवातीला वार्षिक  पॅकेज रू १६ लाख दिले आहे, तसेच प्रणव विक्रमादित्य गाडे यास रू ९ लाख व विनित हर्षद  जोशी  यास रू ८ लाखांचे वार्षिक पॅकेज दिले आहे, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्यावतीने प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.

तीनही अभियंते ग्रामिण भागातील असुन हजारो विद्यार्थ्यांना संजीवनीमुळे नोकऱ्या  मिळत असल्याने ते कुटूंबाचा आधार बनुन ग्रामिण अर्थकारणालाही चालना देत आहे. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजची ऑटोनॉमस शिक्षणाची पहिली बॅच मागील वर्षी  बाहेर पडली. चालु वर्षी  दुसरी बॅच बाहेर पडत आहे. संस्थेला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. तसेच ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभाग नामांकित कंपन्यांमध्ये निवड होण्यासाठी शास्त्रशुध्द प्रशिक्षण  देत आहे.

यामुळे नामांकित कंपन्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठीत अभियंते मिळत असुन संजीवनीच्या अभियंत्यांना  मागिल वर्षाच्या तुलनेत अधिकचे पॅकेज मिळत आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी यांनी निवड झालेले अभियंते, त्यांचे पालक, डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर व ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट  विभागाचे डीन डॉ. विशाल  तिडके यांचे अभिनंदन केले आहे.