कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगावमध्ये ‘बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले. हे चर्चासत्र सारथी एज्युकेशन छ. संभाजीनगर, करियर कौन्सिलिंग प्लेसमेंट सेल कॉमर्स विभाग व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.सिद्धेश्वर कोंघे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या प्रा. डॉ. उज्ज्वला भोर यांनी भूषविले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे सिद्धेश्वर कोंघे म्हणाले की, “जिद्द, चिकाटी, मेहनत आणि नियोजनबद्ध अभ्यास केला तर बँकिंगच्या परीक्षा सहज पास होता येते, फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे. तसेच त्यांनी ‘श्रमाची पेरणी करा व यशाचे पीक उगवा’ असाही सुचक इशाराही केला. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभलेले अक्षय चोळके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, प्रामाणिक कष्ट केले तर बँकिंग क्षेत्रात नवनवीन संधी विद्यार्थ्यांना मिळू शकतात. कारण या क्षेत्रात अशी अनेक पदे उपलब्ध आहेत त्यासाठीच्या परीक्षांची माहिती व तयारी जाणून घेणे मात्र गरजेचे आहे.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या प्रा. डॉ. उज्ज्वला भोर म्हणाल्या की, “बँकिंग क्षेत्र मोठे आहे, विविध पदांच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी दिल्या पाहिजे? काय करायचे आहे, हे आधी आपण ठरवले पाहिजे तरच आपण यशस्वी होऊ शकतो.”
या कार्यक्रमाचे संयोजन करिअर कौन्सिलिंग आणि प्लेसमेंटचे चेअरमन प्रा. दिलीप भोये,आय. बी. पी. एस. च्या चेअरमन प्रा. डॉ. सीमा दाभाडे व स्पर्धा परीक्षेचे प्रमुख प्रा. संजय गायकवाड यांनी केले होते.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे, प्रा. संतोष महाले, प्रा. डॉ. योगेश दाणे, प्रा.भारती खरणार ,प्रा. गोरक्ष नरोटे,,प्रा.सोनाली दिघे, प्रा. अश्विनी पाटोळे, प्रा. डॉ.बाळू वाघमोडे . डॉ. योगिता भिलोरे, प्रा. मनोज आवारे, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी यांसह सर्व सहकारी प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.अर्जुन भागवत यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील काकडे व प्रा. अक्षय आहेर यांनी केले.तर आभार प्रा. डॉ. सीमा दाभाडे यांनी मानले.