संजीवनीच्या रेणुका काळेला जपानमध्ये २४ लाखांचे पॅकेज

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १४ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या इंडस्ट्री इन्स्टिट्युट इंटरॅक्शन विभागाच्या प्रयत्नामुळे कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाच्या रेणुका दत्तात्रय काळे हीला जपान मधिल टोकियो स्थित  ‘डेटा-एक्स’ कंपनीने तिला अवगत असलेल्या जापनीज भाषेच्या एन ३ लेव्हल पर्यंतच्या कौशल्याच्या जोरावर व कॉम्प्युटर इंजिनिअरींग मधिल आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे भारतीय चलनानुसार वार्षिक पॅकेज रू २४ लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

रेणुकाच्या या यशाबध्दल संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी रेणुकासह वडील दत्तात्रय काळे, आई प्रेरणा काळे यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकूर, विभाग प्रमुख डॉ. डी. बी. क्षिरसागर व इंडस्ट्री इन्स्टिटयूट इंटरॅक्शन  विभागाचे डीन प्रा. अतुल मोकळ उपस्थित होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनीही रेणुका व तिच्या आई वडीलांचे अभिनंदन करून रेणुकाला शुभेच्छा दिल्या.

‘मी अहमदनगर एमआयडीसी येथे किराणा दुकान चालवुन कुटूंबाचा चरितार्थ भागवितो. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्येच प्रवेश  घेण्याची रेणुकाची तिव्र इच्छा होती. मी सुध्दा संजीवनीच्या नावलौकिका बाबत ऐकुण होतो. रेणुकाला येथेच प्रवेश  मिळाला आणि आम्ही निश्चिन्त  झालो. कारण रेणुकाला संजीवनीच्या माध्यमातुनच नोकरी मिळेल, हा विश्वास  होता. आणि तो सार्थ ठरला,’– दत्तात्रय काळे.
 
  ‘माझ्या कॉलेजच्या शिक्षकांनी  मला घडविण्यासाठी घेतलेले कष्ट आणि माझ्या आई वडीलांचे भक्कम पाठबळ, यामुळे मला जपानमध्ये नोकरी मिळाली. आमच्या संपुर्ण कुटूंबातुन नोकरी करणारी आणि परदेशात  जाणारी मी पहिली मुलगी ठरली आहे. हे संजीवनीमुळे शक्य झाले’.- नवोदित अभियंता रेणुका काळे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, संजीवनी शैक्षणिक संकुलातील विविध संस्थांचे विविध विभाग, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीपार्टमेंट, इंडस्ट्री इन्स्टिट्युट इंटरॅक्शन विभाग, संजीवनी इंटरनॅशल रिलेशन्स विभाग, आदी विभाग आपल्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या, विविध स्पर्धांमधिल सहभाग, इत्यादी बाबी  साध्य करण्यासाठी प्रयत्नशिल असतात. याच अनुषंगाने  संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने हिरामेकी या जापनीज भाषा शिकविणाऱ्या एका नामांकित कपनीशी सामंजस्य करार केला आहे. या करारा अंतर्गत एशिया टू जापान या कंपनीने प्रायोजीत केलेला फास्ट ऑफर इंटरनॅयशनल प्रोग्रामच्या माध्यमातुन जपानमध्ये नोकरीसाठी निवड झाली. या माध्यमातुन रेणुका ही तिसरी अभियंता ठरली आहे.