कोपरगाव प्रतिनिधी दि. १७ : कोपरगाव येथील गोक्षक मयुर विधाटे व त्याचे कुटूंबियावर गोरक्षण कार्याचा राग मनात धरुन शेकडो मुस्लिम समुदायाच्या संगनमताने जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रासह हल्ला केला. त्यात मयुर विधाटे व त्याचे कुटूंबिय गंभीर जखमी झाले. जखमीवर रूग्णालयात उपचार सुरु आहे. जमावाने केलेल्या हल्ल्यातील झटापटीत मयुर विधाटे याच्या आईच्या अंगावर हात टाकून तिच्या गळ्यातील तिन तोळ्याचे मनीमंगळसूत्र ओरबाडून घेतले. मुस्लिम समुदायाने जाणिवपूर्वक केलेल्या सशस्त्र हल्ल्याची पोलीस स्टेशनने गांभिर्याने दखल घेतलेली नाही. असे निवेदन सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने पो. नि. भगवान मथुरे यांना भेटून दिले.
या गुन्ह्यात १५० ते २०० लोक गुन्हेगार असतांना केवळ ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वरील घटना घडूनही व पोलीस स्टेशनने त्याची गांभिर्याने दखल न घेतल्याने आज सकाळी मुस्लिम समुदायाने विधाटे याच्या कुटूंबियांस तुम्ही आमच्या विरुद्ध दाखल केलेला गुन्हा मागे न घेतल्यास तुमचे हातपाय तोडू, तुम्हाला जीवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
अशा घटना ह्या संजयनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांमुळे होत असून १० ते १२ गोरक्षकांना जीवे मारण्याची सुपारी दिली आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक अहमदनगर व उपअधिक्षक शिर्डी यांना एक महिन्यापूर्वी गोरक्षक मयुर विधाटे याचेवर प्राणघातक हल्ला होणार असल्याची माहिती पत्राद्वारे दिली होती. या पत्राची वेळेवर दखल घेतली असती तर वरील गंभिर घटना टळली असती. तरी गुन्ह्याचे स्वरुप पहाता कोंबिंग ऑपरेशनद्वारे वरील १५० ते २०० आरोपींना तातडीने अटक करावी व त्यांचेवर कठोर कारवाई करावी.
मुंबईमध्ये १५ दिवसापूर्वी भर रस्त्यात गोरक्षकाची दिवसा हत्या करण्यात आली, तशा हत्येची आपण वाट बघत आहात का? तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी कृपया नोंद घ्यावी. गोरक्षकांवर दबाव टाकण्यासाठी त्यांचेवरच खोटे गुन्हे दाखल करुन पोलीस दडपशाही करीत आहे याचा आम्ही सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद बजरंग दल निषेध करतो. अशा आशयाचे निवेदन देण्यात सकल हिंदु साम्राज्याच्या वतीने पोलीसांना देण्यात आले. तिन दिवसांत वरील आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा सकल हिंदु समाज व विश्व हिंदू परिषद बजरंग कोपरगांव व नगर जिल्हा तिव्र स्वरुपाचे आंदोलन करेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे निवेदनात म्हटले आहे.
दि. १५ ऑगस्ट रोजी कोपरगांव शहर पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक (प्रथम खबर क्र.): ०३४६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ च्या कलम ११८(१) जबर मारहाण, १२५ जीवाला धोका, १८९ बेकायदेशीर जमाव गोळा करणे, १९० मोब जवाबदारी, १९१(२) दंगल, ३२४(४) २० हजार ते १ लाख पर्यंत नुकसान केले, ३३३ बळजबरीने घरात घुसणे, ३५१(२) धमकी देणे, ३५२ शांतता भंग आणि अपमान व खुनाचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये साहीबाज अकबर शेख, शरीफ पठाण, इरफान शेख, शरीफ शेख, अमीर ऊर्फ मद्या सलीम सय्यद, अर्शद शब्बीर शेख, अमन सलीम पठाण आदींवर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून व्हिडीओच्या माहितीच्या आधारे अजून आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पो नि. भगवान मथुरे यांनी यावेळी दिली.