शिबिराचे आयोजन करून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : तालुक्यातील श्रीक्षेत्र अमरापुर  ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री वयश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती ग्रामस्थांना देण्याच्या उद्देशाने, शनिवार दि. २४ रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, समाज कल्याण अधिकारी रामकिसन देवढे, प्रांताधिकारी विकास मते, सरपंच आशाताई गरड आदी उपस्थित होते.

दरम्यान जिल्हाधिकारी सालीमठ यांनी जास्तीत जास्त वंचित लाभार्थ्यांनी शासनाच्या तीनही योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करुन सलग दोन दिवस शिबिराचे आयोजन केल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी उपस्थितांना तीनही योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
शिबिरात तब्बल २५० लाभार्थ्यांनी विविध योजनेचा लाभ मिळावा या करिता अर्ज दाखल केले.     

यावेळी तहसीलदार प्रशांत सांगडे, सहाय्यक विकास गट अधिकारी अजित बांगर, यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी तर आभार सरपंच आशाताई गरड यांनी मानले.