जुनी पेन्शन, निवृत्ती वेतन व इतर मागण्यासाठी संप
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : नगरपरिषद व नगरपंचायत मधील अधिकारी, कर्मचार्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद आदींसह विविध मागण्यांसाठी कोपरगाव नगरपालिकेचे २५० अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.
वेतन शासन लेखा कोषागार मार्फत करण्यात यावे, सहायक आयुक्त, मुख्याधिकारी गट ब पदासाठी ६० टक्के जागा राज्य संवर्ग पदोन्नतीने करण्यात याव्यात. कर व प्रशासकीय, अग्निशमन आणि स्वच्छता निरीक्षक सेवा संवर्ग वेतन श्रेणी ४२०० एस १३ करावी. अभियांत्रिकी संवर्गातील अभियंता यांना इतर विभाग म्हणजे पदनाम व वेतनश्रेणी लागू करावी. संवर्ग सेवेतील श्रेणी अ पदास राजपत्रित गट ब दर्जा आणि श्रेणी ब पदास गट ब (अराजपत्रित ) दर्जा मिळावा.
अ वर्ग नगरपरिषद सीएएफओ पदावर संवर्ग सेवेतील लेखाधिकारी नियुक्ती करावी, पाणी, मलनिस्सारण व स्वच्छता संवर्ग यांची वाढीव पदे निर्माण करावी, संगणक, अग्निशमन व विद्युत या संवर्गाची पदे नगरपंचायतीमध्ये निर्माण करावी. क वर्ग नगर परिषदांना उप मुख्याधिकारी पद निर्माण करावे, राज्य संवर्ग श्रेणी क पदावर २५ जागा स्थानिक कर्मचारी स्वतंत्र परीक्षा किंवा सेवा जेष्ठताने भरावी आदि विविध मागण्या अधिकारी ,कर्मचारी यांच्या संघटनांच्या वतीने करण्यात आल्या आहे.
कोपरगाव नगरपालिकेचे अत्यावश्यक विभाग वगळता इतर सर्व विभागातील पालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्ठ्या संख्येने या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. मुख्याधिकारी सुहास जगताप, ज्ञानेश्वर चाटणे, लेखा परीक्षक तुषार नारकर, रोहीत सोनवणे आदींसह अनेक अधिकारी कर्मचारी कोपरगाव नगरपालीका कार्यालयासमोर बेमुदत संपात सामिल होवून बसले होते.