ढाकणे शैक्षणिक संकुलातील ६७ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे निवड

शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : तालुक्यातील राक्षी येथील समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयोजित कॅम्पस मुलाखती द्वारे एकूण ६७ विद्यार्थ्याची अहमदनगर येथील जि. के. एन सिंटर प्रायव्हेट लिमिटेड व श्री एन्टरप्रायजेस लिमिटेड कं. तसेच औरंगाबादच्या  एसएस कंट्रोल  या नामांकित कंपन्यामध्ये चांगल्या पॅकेजवर  त्यांची निवड झाली आहे.

राक्षीच्या ढाकणे शैक्षणिक संकुलातील गुणवत्ता व कौशल्यपूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत असून, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून या  शैक्षणिक संकुलनामध्ये नव्याने इंजिनीरिंगचा पदवी अभ्यासक्रम तसेच एमबीए अभ्यास क्रम सुरु करण्यात आल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. श्रीकांत ढाकणे यांनी यावेळी दिली.

कॅम्प मुलाखत प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष  एकनाथराव ढाकणे, सचिव जया रहाणें, समन्यवक प्रा. ऋषिकेश ढाकणे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आर. एच. अत्तार, ट्रैनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. महेश मरकड उपस्थित होते.