संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा

कोपरगांव प्रतिनिधी,, दि. १६ : शनिवार, १४ सप्टेंबर २०२४ रोजी संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी येथे स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांचे संकल्पनेतुन हिंदी दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, यात  द्रोणा अकॅडमी साकुरी, संत जनार्दन महर्षी विद्यालय कोपरगाव, संजीवनी अकॅडमी कोपरगाव, रेनबो स्कूल कोपरगाव आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी या शाळेच्या  विद्यार्थ्यांनी सहभाग घेवुन राष्ट्रभाषेचा  सन्मान केला, अशी  माहिती स्कूलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

सोहळ्याची  सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. प्रमुख अतिथी डॉ. संजय दवंगे यांनी हिंदी भाषेची जागतिक ओळख आणि तिचे महत्त्व यावर आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी कविता वाचन आणि भाषण सादर करून हिंदी भाषेप्रती आपली श्रद्धा आणि प्रेम व्यक्त केले.

 डॉ. दवंगे यांनी सांगितले की, हिंदी दिवस दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी भारतातील शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये साजरा केला जातो. १४ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेने घेतलेला निर्णय, भारताची अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा स्वीकार करण्याचा हा दिवस आहे. हिंदी ही एकता आणि संस्कृतीची भाषा आहे. ती केवळ आपली राष्ट्रभाषा नसून आपल्या सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांनी सर्वांना हिंदीच्या प्रसार आणि प्रचारासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.