कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : शहापूर वि.का.सोसायटी चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवडणूक पार पाडली यामध्ये प्रगतिशील शेतकरी असणारे कोल्हे गटाचे सतिश जिजाबा घारे यांची चेअरमनपदी व औताडे गटाचे उमेदवार जिजाबा सोपान डांगे यांची व्हा.चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना चेअरमन युवानेते विवेक कोल्हे, शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यतः शेतकरी जीवनाशी निगडित असणाऱ्या विकास सोसायट्या या ग्रामीण भागाची नाळ आहेत. वाढत्या अर्थचक्रात शेतकरी ग्रामीण भागात नाविण्यपूर्ण पावले टाकू शकतो यासाठी सोसायटी हे महत्वाचे केंद्र ठरते.
यावेळी नितीन पाचोरे, प्रवीण घारे, बाळासाहेब पाचोरे, भाऊसाहेब घारे, सागर घारे, राहुल घारे, जिजाबा घारे, नवनाथ घारे, दिगंबर गोसावी, सुभाष सदाफळ, परशराम पाचोरे, अमोल घारे, दत्तात्रय डांगे, शरद पाचोरे, शरद घारे, कोंडाजी घारे, विठ्ठल सरवार, नानासाहेब डांगे, नानासाहेब घारे, अविनाश घारे, आप्पासाहेब घारे, विजय पाचोरे, वसंत घारे, पवन घारे, साईनाथ घारे, शामराव दुधाट, सुभाष खंडिझोड, गणेश खंडिझोड,
कर्णा खंडिझोड, कांताराम खंडिझोड, अण्णासाहेब खंडिझोड, महेंद्र गायकवाड, भास्कर घारे, राहुल पाचोरे, संभाजी पाचोरे, अभिजित पाचोरे, रविंद्र घारे, बाबासाहेब पाचोरे, मोहन खंडिझोड, बाबासाहेब घारे, नामदेव मोरे, सचिन पाचोरे, सचीन घारे, रामदास घारे निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सचिव मोकळ, निवडणूक अधिकारी नेरे आदी उपस्थित होते.