जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये भारदे हायस्कूलच्या मुलींचे यश

शेवगाव प्रतिनिधी, दि.२३ : जिल्हास्तरीय खो -खो स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील मुलींच्या गटात पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या मुलींच्या संघाने अकोला संघावर मात करीत जिल्हास्तर प्रथम क्रमांक मिळवत विभागीय पातळीवर स्थान निश्चित केले. 

जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व रेसिडेन्शिअल हायस्कूल शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १९ वर्षे वयोगटाच्या जिल्हास्तरीय  खो-खो च्या स्पर्धा नुकत्याच शेवगाव येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या १९ वर्षे मुलींच्या संघाने राहुरी, कर्जत, राहाता आणि अकोला या संघांचा पराभव करून विभागीय पातळीवर धडक मारली.

अंतिम सामन्यांमध्ये ऋणाली प्रजापती, गौरी मोटे, सायली शिरसाठ, श्रुती कर्डिले, श्रद्धा राऊत , सानिका डाके, सिद्धी काळे,  ज्ञानदा भाडाईत, अबोली काथवटे, अमृता क्षीरसागर, दिक्षा धनवडे, कल्याणी बुलबुले, आर्या लटपटे, तनिष्क राठोड आदीं खेळाडूंनी सफाईदार खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. त्यांना क्रीडा शिक्षक सचिन शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. विजयी संघाचे प्रा.रमेश भारदे, हरीश भारदे, प्राचार्य शिवदास सरोदे आदींसह शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.