नवनवीन प्रकल्प राबवण्यात कोल्हे कारखाना कायम अग्रभागी – विवेक कोल्हे 

कोल्हे कारखान्याची६२ वी  सर्वसाधारण सभा संपन्न 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ :  केवळ ऊसावर नाही तर शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मका, गिन्नी गवत  बांबु सह इतर पिकापासुन कोल्हे साखर कारखाना अनेक उपपदार्थ बनवून शेतकऱ्यांच्या हितासाठी अग्रभागी कार्य करणार देशातला पहिला कारखाना आहे. असे मनोगत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले. 

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६२ वी  सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर शनिवारी संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, व्हा. चेअरमन मनेश गाडे, कार्यकारी अधिकारी बाजीराव सुतार, शिवाजी  दिवटे, संचालक विश्वास महाले, ज्ञानेश्वर परजणे, उषा औताडे, सोनिया पानगव्हाणे, विलास वाबळे, केशव भंवर, बापुसाहेब बारहाते, निलेश देवकर व अनेक संचालक आदींची उपस्थिती होती. यावेळी गेल्या गळीत हंगामामध्ये विक्रमी उस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.  सभेपुढे सर्व विषय सर्वानुमते उपस्थित  सभासदांनी एकमुखी मंजुर केले.

 या प्रसंगी बोलताना विवेक कोल्हे पुढे म्हणाले की,  केंद्रशासनाचे इथेनॉलबाबतचे धोरण, साखर निर्यातीचा निणर्य, उपपदार्थ निर्मितीसाठी वाढवलेले पाण्याचे दर यासह अनेक अडचणींवर कारखान्याने मात करत मार्गक्रमण केले आहे. उपपदार्थ निर्मितीसह विविध प्रकल्पामुळे संजीवनी उद्योग समुह इतरांच्या तुलनेत कुठेही मागे नाही. केंद्राने एफआरपीची रक्कम वाढवली त्याच धर्तीवर एमएसपीमध्ये वाढ करून दोघांत सुसूत्रता आणावी. गेल्या दहा वर्षात कोल्हे कारखान्याने उस उत्पादकांना एफआरपीपेक्षा जास्त १५० कोटी रुपये अदा केले. सभासद, करृमचाऱ्यांसाठी दिवाळी गोड करणार. शेतकरी केवळ अन्नदाता नव्हे तर उर्जादाता झाला आहे.

म्हणून  शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्या भाव देण्या बरोबर बाजारपेठ उपलब्ध करण्याचे काय कारखाना करीत आहे. कै. शंकरराव कोल्हे यांनी शेती, पाणी, शेतकरी यासाठी संघर्ष केला. संजीवनी व सलग्न संस्था शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विकास हाच उद्देश घेवून कार्यरत आहे. वाढत्या मधुमेह रोगाच्या पार्श्वभूमीवर जगात शुगर फ्री साखरेला मागणी वाढली आहे. त्यामुळे कोल्हे कारखान्याने शुगर फ्रीचे उत्पादन यशस्वी केले आहे. अत्याधुनिक तंत्रद्यानाचा वापर करत सॅटेलाईटद्वारे शेतकऱ्याच्या उसाची माहिती,ड्रोनने औषधे फवारणी, हार्वेस्टिंग मशीनसाठी व्याजात सूट, इफ्कोचा नॅनो युरिया व इतर उत्पादने, सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

मत्स पालनाचा लाभ शेतकरी घेत आहे. मका, बांबूपासून अल्कोहोल निर्मितीचा प्रकल्प भविष्यात उभारण्यात येणार आहे. स्पेंट वाश, गिन्नी गवतापासून सीएनजी, बीएनजीचा १२ टन क्षमतेच्या प्रकल्पावर काम सुरु असुन येत्या काही महिन्यात नव्या प्रकल्पाचा शुभारंभ करणार आहे. कारखान्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून उस उत्पादकांना जास्तीचा भाव मिळण्यास निश्चित मदत होणार आहे असेही  विवेक कोल्हे म्हणाले.

 यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना बिपिन कोल्हे म्हणाले की, विद्यमान लोक प्रतिनिधीनी केवळ तीन हजार कोटींच्या गप्पा मारु नये पाण्यामुळे शेती उजाड होत आहे. पश्चिमेकडील पाणी पुर्वेला वळण्यासाठी काय केले याचे उत्तर द्यावे असे म्हणत आमदार काळे यांच्यावर निशाणा साधत कोल्हे यांनी भविष्याचा वेध घेत वर्तमानातील लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला.

कै. शंकरराव कोल्हे यांनी दूरदृष्टी ठेवून भाम, भावलीसह विविध धरणांची निर्मिती केली, अहोरात्र काम केले. प्रसंगी स्वकीयांविरुद्ध लढा दिला. त्यातून सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला. जनतेने त्यांना ३५ वर्षे संधी दिली. तुमच्या कारकिर्दीत समन्यायी पाणी वाटप कायदा आला. पाण्यासाठी लोकप्रतिनिधी ऐवजी आपल्याला भांडावे लागते हि शोकांतिका आहे. संधिसाधू राजकरणी म्हणून विद्यमान आमदारांची ओळख आहे. – विवेक कोल्हे