कोपरगावमध्ये ७ उमेदवारांची माघार, १ डझन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४: कोपरगाव विधानसभेसाठी एकूण १९ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी आपली उमेदवारी  माघार घेतली आहे. त्यामुळे आता १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब अजमावणार आहे. महायुतीचे विद्यमान आमदार आशुतोष काळे विरुद्ध महाविकास आघाडीचे विधिज्ञ संदीप वर्पे अशी दुरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र पुढे आले आहे.

विधानसभेसाठी २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत किशोर मारुती पवार (अपक्ष) बाद ठरला होता. निवडणुकीत माघारीचा शेवटचा दिवस आज दि.४ नोव्हेंबर होता. त्यात शंकर सुखदेव लासुरे – (राष्ट्रीय समाज पक्ष) विजय सुभाष भगत, बाळासाहेब कारभारी जाधव, विजय नारायण वडांगळे, राजेंद्र माधवराव कोल्हे, मनीषा राजेंद्र कोल्हे प्रभाकर पावजी आहिरे या सात उमेदवारांनी आपली उमेदवारी माघारी घेतली आहे.

प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार, राजकीय पक्ष व त्यांचे चिन्ह खालीलप्रमाणे –
आशुतोष अशोक काळे –(राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार)- घड्याळ, महेबूब खांॅ पठाण – (बसपा)-हत्ती, संदीप गोरखनाथ वर्पे – (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार)- तुतारी वाजविणारा माणूस, शिवाजी पोपट कवडे –(बळीराजा पार्टी)-ट्रमपेट, शकील बाबुभाई चोपदार – (वंचित बहुजन आघाडी)-गॅस सिलेंडर, किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष)-बॅट, खंडू गहिनीनाथ थोरात (अपक्ष)- ऊस शेतकरी, चंद्रहंस अण्णासाहेब औताडे (अपक्ष)-जहाज, दिलीप भाऊसाहेब गायकवाड-(अपक्ष) – गॅसशेगडी, विजय सुधाकर जाधव (अपक्ष)- ऑटो रिक्षा,  विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष)-शिट्टी, संजय भास्करराव काळे (अपक्ष)- कचरा पेटी