कोपरगांव प्रतिनिधी, दि. ४ : स्पर्धात्मक परिक्षा आणि त्यासाठीची अभ्यास यंत्रणा माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी निर्माण केल्यानेच ग्रामीण भागातील मुले-मुली त्यात चमकत आहे, ते सतत पुढे यावे असे प्रतिपादन राज्य सहकारी साखर संघाचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. येथील राहुल मच्छिंद्र राहणे या विद्यार्थ्यांने अभ्यासाचा ध्यास होत अबकारी (एक्साईज) पोलीस दल परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल, त्याचा संजीवनी उद्योग समुहाचेवतीने सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी बिपीनदादा कोल्हे होते.
भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे प्रास्तविक करतांना म्हणाले की, ग्रामीण भागातील मुला-मुलींना स्पर्धात्मक परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी माजी आमदार स्नेह्त्तता कोल्हे यांनी सातत्यांने सहकार्य केले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष, बिपीनदादा कोल्हे यांनी तालुक्यातील विविध खेळांत नैपुण्य मिळविणाऱ्या खेळाडूंसाठी त्याक्षेत्रातील तज्ञ विनामूल्य उपलब्ध करून देत जिल्हा, राज्य व देशपातळीवरीत क्रिडा स्पर्धेत विशेष पुढाकार घेतला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांसह वंचित घटकांच्या दारी शिक्षणाची गंगोत्री आणली. जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेचा विस्तार करण्यांत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे मोठे योगदान असून त्यातून शैक्षणिक स्तर उंचावत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धात्मक परिक्षेत् चमकले पाहिजे, या स्वप्नपुर्ती साठी त्यांनी मेहनत घेतली., त्याचा उपयोग मुला-मुलींना होतांना दिसत आहे. राहुल राहणे याने प्रतिकुल परिस्थीतीवर जे यश मिळवले ते अनेकांना प्रेरणादायी आहे. शेवटी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.