शेवगांव प्रतिनीधी, दि. २९ : महाराष्ट्राच्या जडणघडणीत साहित्य आणि विचाराच्या माध्यमातून एक परिवर्तनवादी चळवळ उभी करणारे लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना औरंगाबाद येथील एम.जी.एम. ( माहात्मा गांधी मेमोरीयल ) विद्यापिठाने पहिली मानद मरणोत्तर डि.लीट पदवी देऊन सन्मानित केल्याची बातमी समजताच येथील त्यांच्या चाहत्यांनी शेवगाव मध्ये फटाके वाजवुन ढोल ताशाचा गजर करत पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
साहित्य रत्न, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डि .लिट. पुरस्काराने सन्मनीत करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक, शास्त्रज्ञ, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांचे उपस्थितीत एमजीएमचे कुलपती डॉ. अंकुश कदम यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊच्या स्नुषा सावित्रीबाई मधुकर साठे यांनी डी लिट स्वीकारली. या आनंदा प्रित्यर्थ अण्णाभाऊंच्या चाहत्यांनी शेवगावात अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार आर्पण करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष विजयराव देशमुख यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपाध्यक्ष विष्णू घनवट, सायली सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रविण भारस्कर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्र आणि साहित्य बद्दल माहिती दिली. भारस्कर यांनी अण्णाभाऊना भारतरत्न मिळावे अशी मागणीही केली.
या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, वसीम भाई मुजावर मित्र मंडळ, पिंजारी मन्सूरी जमात शेवगाव ह्या सर्व सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.