कर्मवीर शंकरराव काळे साहेबांचे जीवन म्हणजे भक्ती आणि कर्माचा संगम – ह.भ.प. संदिपान महाराज शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५:  कर्माच्या शक्तीचा सदुपयोग केला तर आपल्याला परमात्मा स्वरूपाचे जीवन प्राप्त होते. कर्मवीर स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांचा जीवनपट पाहिल्यावर जनक राजाची आठवण होते. कर्मवीर शंकररावजी काळे आदर्श जीवन जगले. त्यांनी आपल्या जीवनात सत्तेपेक्षा जनसेवेला महत्व देवून सेवा करतांना कोणताही हेतू ठेवला नाही. कोणतीही अपेक्षा न करता केलेली सेवा हि जिव्हाळा असते आणि हाच जिव्हाळा कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आयुष्यभर जपला असून त्यांचे जीवन भक्ती आणि कर्माचा संगम असल्याचे प्रतिपादन ज्ञानसिंधू ह.भ.प. संदिपान महाराज शिंदे (हसेगावकर) यांनी केले आहे.

शिक्षण, सहकार, कृषी, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाचा अजोड ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक, माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १२ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात आयोजित कीर्तनरूपी सेवेप्रसंगी ज्ञानसिंधू ह.भ.प. संदिपान महाराज शिंदे (हसेगावकर) बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, संत हे महाराष्ट्राचे वैभव आहे. काळे परिवाराकडे जनसेवेचा वारसा आहे. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी राजकीय जीवनात मिळालेल्या सत्तेतून जनतेची नितांत सेवा केली शैक्षणिक, सामाजिक, कृषी, पाणी प्रश्न आदी क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून  रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडून कर्मवीर शंकरराव काळे यांना अमूल्य साधना मिळाली. त्या साधनेतून त्यांनी शिक्षण क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यानंतर अजोड कामगिरी केली. एका बाजूला कर्माची साधना तर दुसऱ्या बाजूला भक्तीची साधना असलेले कर्मवीर शंकरराव काळे एकमेव व्यक्तीमत्व होते. त्यांनी समाजाची सेवा करतांना कोणत्याही फळाची कधीच अपेक्षा केली नाही त्यामुळे त्यांचे जीवन हे निष्काम कर्मयोगी असल्याचे ह.भ.प. संदिपान महाराज शिंदे (हसेगावकर) यांनी सांगितले.

यावेळी मा.आ.अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे, डॉ.सौ. मेघनाताई देशमुख, अॅड. प्रमोद जगताप, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण,  ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, सिकंदर पटेल, बाळासाहेब कदम, पद्माकांत कुदळे, एम.टी.रोहमारे, बाबुराव कोल्हे, विश्वासराव आहेर, ज्ञानदेव मांजरे, बाबासाहेब कोते, बाबुराव कोल्हे, संभाजीराव काळे, पं.स.मा. उपसभापती अर्जुनराव काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारूदत्त सिनगर, राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा सौ. वैशाली आभाळे,

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असी.सेक्रेटरी संदीप शिरसाठ, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य, संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.