शेवगांव प्रतिनिधी, दि. ४ : भारतीय जनता पक्षाच्या गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. त्यांची आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदी निवड होणार असल्याने आमदार मोनिकाताई राजळे यांचे मार्गदर्शनाखाली शेवगांव तालुका भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी शेवगावच्या चौकाचौकात फटाक्याची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी पेढे वाटत आनदोत्सव साजरा केला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास अभिवादन करून लोकनेते स्व.गोपिनाथ मुंडे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. भाजपाचे जेष्ठ नेते दिनेश लव्हाट, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेश फलके, भाजपा शहराध्यक्ष बापु धनवडे, जिल्हा सरचिटणीस गंगा खेडकर, भिमराज सागडे, संदिप खरड, ह.भ.प. चंद्रशेखर मुरदारे, मनसे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, सागर फडके, नितीन दहिवाळकर, कमलेश गांधी, रविंद्र सुरवसे, सुरेश नेमाणे, सुभाष बडधे, केशव आंधळे, राजेंद्र डमाळे, मनोज कांबळे, शिवाजी समिंदर, डॉ. निरज लांडे, राहुल बंब, अमोल माने, किरण काथवटे, सुभाष भवार सर, नितीन देवढे, विनोद शिंदे, राजेंद्र घनवट, कैलास सोनवणे सर, संतोष कंगणकर, बाजीराव लेंडाळ, ॲङ आकाश लव्हाट, सुधीर जायभाये आंदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवगांव – पाथर्डी मतदारसंघात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या सहकार्याने मतदारसंघात मोठी विकास कामे झाली आहेत, मतदारसंघातील रस्ते, पाणी योजना, शेती सिंचनाची कामे, बंधारे आदी कामांसाठी सन २०१४ मध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर भरघोस निधी मिळाला असुन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मतदारसंघातील उर्वरित विकास कामे पुर्ण होणार असल्याचा कार्यकर्त्यांमध्ये विश्वास संचारला आहे.
सरकार आणि संघटना या दोन्ही आघाड्यांवर देवेंद्र फडणवीस हे यशस्वी नेतृत्व करून महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या शिखराकडे घेवुन जातील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
हॅट्ट्रीक फळाला येवो : आ. राजळे मंत्री होवोत
शेवगांव – पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्रिक केली आहे. त्याचबरोबर भाजपाच्या गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची हॅट्रिक करणार आहेत. मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यासाठी ही डबल हॅट्रिक असल्याने मंत्रीमंडळ विस्तारात जून्या व एकनिष्ठ असलेल्या आमदार मोनिकाताई राजळे यांना देखील संधी मिळायला हवी अशी भावना अनेक कार्यकर्त्यानी यावेळी व्यक्त केली.