कोपरगाव तालुक्यात विज चालु, पण कर्मचाऱ्यांचे काम बंद

खाजगीकरणाच्या विरोधात महावितरण कर्मचाऱ्यांचे काम बंद अंदोलन 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.४ : कोपरगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विजवितरण विभाग, महापारेषण व महानिर्मिती विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी शहरातील विजवितरण कंपनीच्या कार्यालयासमोर काम बंद अंदोलन सुरू केल्याने सामान्य नागरीकांची बत्ती गुल होण्याची वेळ आली होती माञ कोपरगाव शहरासह तालुक्यात विजवितरणच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन जरी सुरु केले तरी विज पुरवठा माञ सुरु होता. 

 सोमवारी राञी १२ वाजल्यापासून सर्व विजवितरण कर्मचाऱ्यांनी काम बंद अंदोलन सुरू केले. राज्य सरकार विजवितरणचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेणार असल्याने एका खाजगी कंपनीच्या ताब्यात देत असल्याने शासनाच्या सेवेतील विजवितरणच्या कर्मचाऱ्यांनी खाजगीकरणाला प्रखर विरोध दर्शवला असुन त्याच एक भाग म्हणून सोमवारी राञी पासुन तालुक्यातील शेकडो कर्मचाऱ्यांनी कामबंद अंदोलन सुरू केले.

विशेषत राज्यातील विविध तीस संघटनाच्या ८५ हजार कर्मचाऱ्यांनी राज्यभर काम बंद आंदोलनात सहभाग घेतल्याने राज्य अंधार जाण्याची वेळ आली होती. माञ सायंकाळी वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा झाल्याचा निरोप कर्मचारी संघटनेच्या प्रमुखांनी कळवल्यानंतर अखेर विजवितरणच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद अंदोलन अखेर मागे घेण्यात आल्याने विज पुरवठा व कामकाज सुरळीत सुरु झाल्याने नागरींकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.