आत्मा मालीकचे भरत नायकल यांना आदर्श वस्ताद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 

 आत्मा मालीक कुस्ती केंद्राच्या वस्तादचा सन्मान लक्षवेधी 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालीक कुस्ती केंद्राचे वस्ताद भरत नायकल यांना महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ यांच्या मान्यतेने व  कै.पै.व्यंकाप्पा बुरुड चारिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दख्खन काला पहाड महान मल्ल कै.पै.व्यंकाप्पा बुरुड राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.  हा पुरस्कार वितरण सोहळा सांगली  आयोजित करण्यात आलेला होता. 

कुस्ती क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा मानल्या जाणाऱ्या  या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्र भरातून अर्ज मागवण्यात आलेले होते. तब्बल  १०६ जणांनी अर्ज केले होते. आलेल्या अर्जापैकी व्यंकाप्पा बुरुड यांचे नातू विशाल बुरुड सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ५ जणांच्या समितीच्या वतीने ‘आदर्श वस्ताद’ या पुरस्कारासाठी आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक नामवंत पैलवान  ज्यांनी शुध्द शाकाहारी पैलवान घडवून देशभरासह राज्यात अनेक पैलवान नावारुपाला आणले असे भरत नायकर यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली होती.

नायकल यांनी आत्मा मालिक माऊलींच्या विचाराला अनुसरून आपल्या उभ्या आयुष्यात फक्त कुस्ती हाच श्वास आणि कुस्ती हाच ध्यास हाच भाव मनी बाळगून आजपर्यंत कुस्ती क्षेत्रात केलेल्या उत्तम कार्याची  पोहचपावती म्हणूनच का हा पुरस्कार भरत नायकल यांना  मिळाला.

सांगली येथे वितरीत झालेल्या पुरस्कार सोहळ्याला १९७१ सालचे हिंदकेसरी मा.पै दीनानाथ आण्णा सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष व सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष मा. नामदेवरावजी मोहिते (बापू), जेष्ठ कुस्ती निवेदक मा. शंकर (आण्णा) पुजारी, मल्लसम्राट मा.रावसाहेब (आप्पा) मगर, राष्ट्रपती पदक प्राप्त इतिहासकार लेखक मा. भा.ल.ठाणगे (सर), कुस्ती मल्लविद्या संस्थापक मा. गणेश मानुगडे (सर), ऑल इंडिया चॅम्पियन मा. विजय नांगरे वस्ताद, महाराष्ट्र चॅम्पियन मा. बाजीराव काका सनगर,मा.राजेंद्र फडतरे (सर),लोणी देवकर इंदापूरचे सरपंच मा. अमोलशेठ थोरवे या मान्यवरांची प्रमुख  उपस्थिती होती.

या मान्यवरांच्या हस्ते नायकल यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. दख्खन काला पहाड महान मल्ल कै.पै.व्यंकाप्पा बुरुड आदर्श वस्ताद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४  मिळाल्याबद्दल आत्मा मालीक गुरूदेव माऊलींसह संत परमानंद महाराज, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे  सह  सर्व विश्वस्त, संत मांदीयाळीसह आत्मा मालीक भक्त परिवारानीवस्ताद भरत नायकल यांच्यावर  अभिनंदनाचा  वर्षाव केला आहे.  

 भरत नायकल  यांनी आत्मा मालीक कुस्ती केंद्रातून हजारी मल्ल घडवून राज्यासह देशातील अनेक कुस्तीचे आखाडे गाजवले. आत्मा मालीक कुस्ती केंद्राचे मल्ल शुध्द शाकाहारी असल्याने त्यांच्या बद्दल सर्वञ कुतुहल व्यक्त केले जाते. 

Leave a Reply