न्यू आर्ट्स महाविद्यालयात डॉ. आंबेडकर यांना परीक्षेतून अभिवादन

शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात ग्रंथालय विभागाद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्याच लिखाणावर आधारित शंभर गुणाच्या राज्यस्तरीय परीक्षेचे आयोजन करून  डॉ.  आंबेडकरांना अभिनवरित्या वैचारिक अभिवादन करुण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स नागपूर व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय वैचारिक अभिवादन परीक्षेचे आयोजन  करण्यात आले.

यावेळी प्राचार्य डॉ पुरुषोत्तम कुंदे म्हणाले, वैचारिक अभिवादन ही परीक्षा डॉ. बाबासाहेब यांनी लिहलेल्या साहित्यावर आधारित असल्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांना त्यांचे साहित्य वाचने क्रमप्राप्त होते. त्यामुळे हे अभिनव अभिवादन असल्याने  ग्रंथालयाचा हा उपक्रम कौतुकास पात्र आहे. 

ग्रंथपाल प्रा. मिनाक्षी चक्रे म्हणाल्या, विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस कमी होत असलेली वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी, संशोधनात्मक विवेचन आणि विश्लेषणनाची रुची वाढावी याकरिता अशा वैचारिक उपक्रमाची गरज असते. यातुनच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याची पात्रता निर्माण होते व एक जबाबदार नागरिक बनण्याच्या दृष्टीने वाटचाल व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

    या परीक्षेस विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमास उपप्राचार्य प्रा. भाऊसाहेब अडसरे, प्रा. विजय शेळके, डॉ. गोकुळ मुंढे, डॉ. छाया भालशंकर, छाया जाधव, उषा लवांडे, प्रा. ढाकणे , अयोध्या देवकर, प्रियांका वाघमारे, नंदू बर्डे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply