शेवगाव प्रतिनिधी, दि. ७ : येथील भारदे गल्लीतील श्री दत देवस्थानात श्री दत्तात्रय प्रकटोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दिनांक ९ ते १५ डिसेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान भरगच्च सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
श्री दत्त मंदिर देवस्थानाच्या वतीने ९ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान दत्तात्रेय प्रकटोत्सव सोहळ्या निमित ९ डिसेंबर रोजी १० वाजता शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लातूर येथील अजय रेड्डी धर्मवीर प्रतिष्ठान द्वारा प्रशिक्षित रणरागिनी व मावळे शिवकालीन शस्त्रविद्याचे नयन मनोहर सादरीकरण करणार आहेत, यावेळी साध्वी तृप्ति ताई निंबाळकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा टायगर फोर्स ( महिला प्रकोष्ठ) विशेष अतिथी उपस्थित राहणार आहे.
दुपारनंतर ३ ते ६ या वेळेत यज्ञेश्वर लाठकर महाराज (नांदेड) यांचे शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दि १० डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत गायिका हरिप्रिया गोविंद घायाळ (जाटदेवळेकर), यांच्या भक्ती गीताचा कार्यक्रम होईल. दि ११ सायंकाळी ७ ते ९ या वेळेत गायिका माधवी कुलकर्णी (श्री क्षेत्र नेवासा) निवेदिका छाया गुजराती (श्रीक्षेत्र नेवासा) यांचा भक्ती गीताचा कार्यक्रम होईल. दिनांक १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९ रोजी बासरी वादक भगवान कुलकर्णी यांचा कार्यक्रम होईल. डिसेंबर १३ रोजी दत्त याग सोहळा सकाळी ८ ते १ या वेळेत वेदशास्त्र संपन्न संजू देवा मुळे यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
दि १४ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता एकादाशिनी रुद्राषेक करण्यात येणार आहे. १५ डिसेंबर रोजी मंदिरांचे व्यवस्थापक पुजारी शिरीष भारदे यांचा षष्ठी पूर्ती सोहळ्या निमित्त सकाळी ११ वाजता रुद्र शांती व अन्य धार्मिक कार्यक्रम तसेच ६१ दिव्यांनी ओवाळणे कार्यक्रम होणार आहे. तरी या सोहळ्यासाठी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दत्त मंदिराचे संयोजकांनी केले आहे.
१५ डिसेंबर रोजी महामंडलेश्वर श्री श्री अच्युतानंद सरस्वती प्रदेश अध्यक्ष (संत समाज) हिंदू टायगर फोर्स तथा राष्ट्रीय अध्यक्ष गौ सेवा, मंदिर संरक्षण, संत सनातन धर्म सेवा संस्थान, जिल्हाध्यक्ष योगी अखाडा यांच्या हस्ते मंत्र सिद्ध रुद्राक्ष वाटप करण्यात येईल. कार्यक्रमाचे प्रायोजक चंद्रशेखर घुले पाटील मित्र मंडळ व महाप्रसाद माहेश्वरी मित्र मंडळाच्या सौजन्याने होणार आहे.