गुणदर्शन स्पर्धेत ठाकूर निमगाव शाळेचे यश        

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : तालुक्यातील चापडगाव केंद्र  शाळेत घेण्यात आलेल्या विविध गुणदर्शन स्पर्धामध्ये ठाकूर निमगाव शाळेने विविध प्रकारात लक्षणीय बाजी मारली आहे.  वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत या शाळेतील भक्ती भाऊसाहेब कातकडे प्रथम क्रमांक, किलबिल गट आरती गणेश कातकडे हीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

कुमार गटात समृद्धी किशोर निजवे हीने तृतीय क्रमांक तर वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत आकांक्षा प्रकाश निजवे कुमार गटात प्रथम तसेच कथा गोष्ट सादरीकरण स्पर्धेत कुमार गटात भक्ती बंडू शिंदे हीने प्रथम, वकृत्व स्पर्धा कुमार गटात कल्याणी रामहरी प्रथम, किशोर गट कृष्णा संतोष हुंबे द्वितीय क्रमांक ओंकार फरताळे प्रथम क्रमांक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या गटात केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

विजयी विद्यार्थ्यांचे  व शाळेतील शिक्षक वृंदाचे ठाकूर निमगावचे  सरपंच संभाजी कातकडे व सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते ,शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर व केंद्रप्रमुख जाधव, मुख्याध्यापक  राजकुमार शहाणे यांनी अभिनंदन केले आहे. 

Leave a Reply