शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : श्री दत्त जयंती निमीत्त शहरातील विविध दत्त मंदिरात दत्त नामाचा जयघोष करण्यात आला. दादाजी वैशंपायन नगरमधील श्री दत्त मंदिरात ग्रामस्थ,भाविक व मान्यवरांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी उशीरापर्यंत रिघ लागली होती.
पाथर्डी रस्त्यावरील वैशंपायन नगरमधील श्री दत्त मंदिरात पारायण, दत्तयाग, श्री सत्य दत्त महापूजा, पालखी सोहळयाचे आयोजन करण्यात आले. बालाजी देवस्थानचे कर्जत येथील दयानंद महाराज कोरेगावकर यांचे श्रीदत्त जन्मावर किर्तन झाले. यावेळी डॉ. सुभाषचंद्र व भारती बाहेती या दाम्पत्यांसह शरदकाका वैशंपायन, ललिता वैशंपायन, वृषाली कुसळकर, देवस्थानचे अध्यक्ष अर्जुनराव फडके, सचिव फुलचंद रोकडे यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढून जन्मोत्सव साजरा केला.
यावेळी शोभा फडके, लक्ष्मण काळे, पी.बी शिंदे, बाबुशेठ जोशी, संजय फडके, जगन्नाथ गोसावी, बाळासाहेब मुरदारे, दिलीप फलके, निवृत्ती गोरे, सारंधर म्हस्के, भगवान धुत, जनार्धन हरके, सुरेश घुले, अभय पालवे, बंडू भोर, योगेश तायडे, संजय कुलकर्णी, सुभाष गोलांडे, सुभाष घुगे आदींसह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाचे आयोजन गुरुदत्त प्रतिष्ठा मारवाडगल्ली यांच्या वतीने करण्यात आले.