कटरीना कैफने घेतले साई बाबांचे दर्शन

शिर्डी प्रतिनिधी, दि. १६ : प्रसिद्ध सिने अभिनेत्री कटरीना कैफ हीने सोमवारी दुपारी शिर्डीत दाखल झाली. ऐन १२ वाजता तीचे साई मंदिर परिसरात आगमन झाले. मात्र त्यावेळी साई मंदीरात साईबाबांची दुपारची मध्यान आरती सुरु असल्याने तीला मंदीरात जाता न आल्याने साई मंदिराच्या बाहेर उभे राहतच तीने साईच्या आरतीला हजेरी लावली.

साईबाबांची आरती संपल्यावर कतरीनाने साई मंदीरात जात साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतल. तीने साई समाधीवर ‘साई राम’ नाव असलेली शॉलही अर्पन केली.  दर्शनानंतर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे यांनी तिचा संस्थानच्या वतीने सत्कार केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते.

आपल्या चाहत्यांपासुन लपण्यासाठी मंदीरा बाहेर तीने मास्क लावुनच वावरणे पसंत केले. मात्र कतरीणा साईमंदीरात आल्याची बातमी परीसरात पसरल्याने तीला पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

कतरीणा कैफ बऱ्याच वर्षांपूर्वी सलमान खान बरोबर साई दर्शनासाठी आली होती. त्यावेळी ती न्युकमर अभिनेत्री होती. त्यानंतर तीने चित्रपटात प्रसिद्धीचे शिखर गाठले. त्यानंतर तीने सोमवारी बऱ्याच वर्षानंतर शिर्डीत येत साई समाधीचे दर्शन घेतल.

Leave a Reply