के. जे. सोमैया महाविद्यालयात आकाश दर्शनाचा खगोल प्रेमींनी घेतला आनंद 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात अँस्ट्रो क्लब तर्फे बुधवार दि.१३ डिसेंबर रोजी रात्री उल्का वर्षाव व आकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खगोलप्रेमींना जेमिनीड उल्कावर्षाव हा अंधाऱ्या ठिकाणावरून स्पष्ट बघता यावा यासाठी महाविद्यालयातील अँस्ट्रो क्लब च्या वतीने अद्ययावत ऑब्झरर्वेट्री द्वारे खगोल प्रेमींनी आकाश दर्शनाचा मनमुराद आनंद घेतला.

विशेष करून आकाशातील गुरु ग्रह त्याचे विविध उपग्रह यांचे निरीक्षण खगोल प्रेमीनी यावेळी केले. तसेच आकाशातील सर्वात तेजस्वी तारा व्याध (सिरस) ताऱ्यांचे सूक्ष्म निरीक्षण खगोल अभ्यासकांनी केले. हे विहंगमय दृश्य पाहण्यासाठी लहान मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात अँस्ट्रो क्लब तर्फे अद्ययावत सुख-सुविधांनी निर्मित अशा ऑब्झरर्वेट्री (अवकाश निरीक्षण केंद्र) च्या वतीने आयोजित उल्का वर्षाव दर्शन कार्यक्रमासाठी कोपरगाव परिसरातील अनेक सूज्ञ नागरिक व लहान मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये खगोल अभ्यासक व महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्रा.डॉ.वसुदेव साळुंके व प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.योगेश लाडे यांनी गुरु ग्रह, काही ठळक तारे व जेमिनीड उल्काची निर्मिती, त्यांचा वेग व कालावधी तसेच अकाशातील काही मनोरंजक घटनांचे संबधी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी कोपरगावचे प्रसिद्ध विधिज्ञ् मा.शार्दूल देव, मा.सत्येन मुंदडा, विश्वस्त संदिप रोहमारे, प्राचार्य डॉ.बी.एस.यादव, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, डॉ. संजय दवंगे, प्रा. रोहन यादव, प्रा.सुभाष सोनवणे यांच्यासह कोपरगाव शहरातील विविध शाळेचे शिक्षक उपस्थित होते.