कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी डॉ. मच्छिंद्र बर्डे 

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व कोपरगाव तालुका तसेच पंचक्रोशीतील शेतकरी, छोटेमोठे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी कारखान्याचे संचालक डॉ. मच्छिंद्र रंगनाथ बर्डे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

Mypage

कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष दिलीप बोरनारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी डॉ. मच्छिंद्र बर्डे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. यावेळी आपल्या निवडीबद्दल बोलताना नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे साहेब व माजी आमदार अशोक काळे यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम करून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली आहे.

Mypage

ही परंपरा कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे पुढे चालवत आहे. माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करून आ. आशुतोष काळे यांनी कारखाना प्रगतीपथावर ठेवला. हे सर्व संचालकासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.

Mypage

एकीकडे कोपरगाव मतदार संघाच्या विकासाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असून मतदार संघाच्या विकासाबरोबरच कारखाना देखील त्यांच्या नेतृत्व कौशल्यातून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अशा परिस्थितीत कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे यांनी माजी आमदार अशोक काळे, आ. आशुतोष काळे व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले. 

Mypage

यावेळी बोलतांना मावळते उपाध्यक्ष दिलीप बोरनारे म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे व माजी आमदार अशोक काळे यांच्या सोबत काम केले व कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या सोबत देखील उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असताना सहकारी साखर कारखानदारीच्या उत्तम नियोजनाचा आदर्श आ. आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीतून अनुभवयास मिळाला. काळे परिवाराच्या आदर्श समाजकारणाचा वसा पुढे घेवून जाताना कारखान्याच्या माध्यमातून सर्व सहकारी सदस्यांना विश्वासात घेवून आ. आशुतोष काळे यांनी सर्वोतोपरी सहकार्य केल्यामुळे मला मिळालेली जबबादारी चांगल्या पद्धतीने पार पाडता आली.

Mypage

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेने त्यांच्या खांद्यावर दिलेली विकासाची जबाबदारी त्यांनी निश्चितपणे पार पाडली आहे. परंतु त्याच्याकडून जनतेच्या विकासाच्या अजुन अपेक्षा असून जनतेच्या या अपेक्षा आ. आशुतोष काळे नक्की पूर्ण करणार असून भविष्यात कोपरगाव मतदार संघ विकासाच्या बाबतीत अव्वल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संतोष शिरसाठ व पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक उपसंचालक (साखर) अहमदनगर डॉ. प्रविण लोखंडे यांनी काम पाहिले. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *