राहात्याच्या आदितीची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

 राहता प्रतिनिधी, दि. २३ :  पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन तसेच वॉरियर्स क्रिकेट ॲकॅडमी पुणे या क्लबची महिला क्रिकेटपटू आदिती वाघमारे हिची नुकतीच महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील महिला क्रिकेट संघात निवड झाली असून आदिती ही राहाता शहरातील जिल्हा परिषद शिक्षक संजय वाघमारे यांची कन्या आहे.

 आदिती गेल्या चार वर्षापासून पुणे येथे सातत्याने क्रिकेटचा सराव करत आहे. मागील वर्षी तिची महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील महिला क्रिकेट संघात निवड झाली होती बी.सी.सी.आय. अंतर्गत होणाऱ्या या देशपातळीवरील सर्व सामन्यांमध्ये अतिशय चांगली कामगिरी करून तिने महाराष्ट्र संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

आदिती ही अतिशय प्रतिभाशाली  क्रिकेटपटू आहे. सरावातील सातत्य, प्रचंड मेहनत व कुटुंबीयांचा भक्कम आधार यामुळे ती नक्कीच भविष्यात भारतीय संघात स्थान मिळवेल यात शंका नाही. स्वप्निल मोडक,  मुख्य प्रशिक्षक ) 

यावर्षीही अनेक सामन्यांमध्ये तिने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करून सामनावीर मालिकावीरचा किताब पटकावलेला आहे. या निवडीसाठी होणाऱ्या सर्व शारीरिक चाचण्यांमध्ये तसेच सर्व सामन्यांमध्ये तिने सातत्याने चांगली कामगिरी  करून या संघात स्थान पटकावलेले आहे. या सर्व सरावामध्ये तिला नेहमी पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विवेक डफळ सर, संघटनेचे सचिव सुशील शेवाळे सर, वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी पुणेचे मुख्य प्रशिक्षक स्वप्निल मोडक सर यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.

तीने आत्तापर्यंत १६७ क्रिकेट सामन्यांमध्ये अष्टपैलू कामगिरी करत ४ शतके, १५ अर्धशतकाच्या मदतीने ३५१० केल्या व १७७ विकेट घेतल्या आहे. तिने तिच्या या यशाचे श्रेय आपले आई-वडील, संपूर्ण परिवार तसेच मुख्य प्रशिक्षक स्वप्निल मोडक सर यांना दिले आहे. पुढे ही सातत्याने चांगली  कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आपण  प्रयत्नशील राहणार आहोत असे आदितीने सांगितले. 

ग्रामीण भागांत क्रिकेट खेळण्यासाठी कुठलेही  सुविधा नसताना जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर तसेच कुटुंबातील सदस्य व मित्रांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे आदितीने महाराष्ट्र क्रिकेट संघात २३ वर्षीय वयोगटात निवड होण्याचा बहुमान मिळाला याचा आम्हाला व राहातेकरांना अभिमान आहे. संजय वाघमारे , आदितीचे वडील