व्हि स्टार मार्शल आर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी

राहाता प्रतिनिधी, दि. २५ : राहात्यातील व्हि स्टार मार्शल आर्ट कराटे अकॅडमी विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी करत ६४ पदकं मिळवत मोठे यश संपादन केले आहे.  

  क्रीडा युवा व सेवा संचालित महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा व जिल्हा परिषद कार्यालय अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी नगर राजे शिव छत्रपती संभाजी महाराज सामाजिक संस्कृत क्रीडा मंडळ महाराष्ट्र मार्शल आर्ट शतकोन कराटे असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय कराटे स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे  संपन्न झाली.या स्पर्धे राहात्यातील व्हि स्टार मार्शल आर्ट कराटे अकॅडमी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले.

या स्पर्धेमध्येझ एकूण ३२ विदयार्थीनी सहभाग घेतला होता.यामध्ये एकूण ४१ गोल्ड, २२ सिल्व्हर, १ ब्राँझ  असे एकूण ६४ पदक मिळाले आहेत. त्याबरोबरच प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ही संस्थेने मिळवली आहे. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या अवनी सूर्यवंशी, खुशी पावटे, युगंधरा सदाफळ  यांनी २ गोल्ड मेडल तर हर्षदा जाधव गोल्ड व  सिल्व्हर मेडल, तन्वी लांडबिले २ गोल्ड, साक्षी पाथरकर १ गोल्ड व १ सिल्व्हर,

आर्या कुसळकर १ गोल्ड व १ ब्राँझ, सई लांडबीले २ गोल्ड श्रावणी कोरेकर २ सिल्व्हर ओवी माळी १ गोल्ड व १ सिल्व्हर, आराध्या मुर्तडक २ सिल्व्हर, अदिती वाघ १ गोल्ड व १ सिल्व्हर, धनश्री सदाफळ १ गोल्ड व १सिल्व्हर मेडल, श्रीराम भोसले २ गोल्ड, आरुष सणस २ गोल्ड, स्वराज साबळे २ गोल्ड मेडल,कमलेश वाघमारे १ गोल्ड व १ सिल्व्हर, वैष्णव तुपे १ गोल्ड व १ सिल्व्हर, अनंत मोगल २ गोल्ड, आनोष घटुळे १ गोल्ड व १ सिल्व्हर, सत्यजीत बोरुडे १ गोल्ड व १ सिल्व्हर, सात्विक घाटूळे १ गोल्ड व १ सिल्व्हर,

आयुष निमसे १ गोल्ड व १ सिल्व्हर, हर्षल मोगल २ गोल्ड, प्रणित झोडगे १ गोल्ड व १ सिल्व्हर, सई निमसे 1 गोल्ड व 1 सिल्व्हर मेडल,आदित्य निकळे 1 गोल्ड व १ सिल्व्हर, आशिष प्रभुणे २ गोल्ड, विश्वजीत बोरुडे १गोल्ड व १ सिल्व्हर मेडल, पुरुषोत्तम लेंभे १ गोल्ड व १सिल्व्हर, दक्ष कुसळकर १  गोल्ड व १ सिल्व्हर, ऋषिकेश वाघमारे १ गोल्ड व १ सिल्व्हर असे एकूण ६४ गोल्ड, सिल्वर, ब्रांच पदकं विद्यार्थ्यांनी मिळवले आहे.

कराटे स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विजय मोगले सर, अनिल सोमवंशी सर, भावना निमसे मॅडम, वसीम शेख सर, निलोफर शेख मॅडम, श्रावणी निमसे, प्राची निमसे, अंजूम शहा, कल्पेश वाघमारे, कर्नल पावटे कराटे प्रशिक्षक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. 

तंदुरुस्त व निरोगी आरोग्य जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरिक्त वापर न करता मैदानी खेळाला प्राधान्य देणे गरजेचे आहे मुलींनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कराटे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. – विजय मोगले सर, कराटे प्रशिक्षक राहाता

Leave a Reply