गोदावरी बायोरिफायनरीच्या अधिकार्‍यांनी जपली सामाजिक बांधिलकी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०४ : श्री गणेश चतुर्थीला ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर अनंतचतुर्दशीला गुरुवारी(ता. १८) गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच गणेश भक्तांनी गणरायाची स्थापना केली होती. गणेश उत्सवामुळे सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. सर्व गणेश भक्तांनी उत्साहात व शांततेत गणरायांना निरोप दिला. 

कोपरगाव तालुक्यातील वारी या गावाचा इतिहास सांगणारे आणि वारीच्या सौंदर्याचा मुख्य भाग असणारी गोदावरी नदीकाठ गतवर्षीप्रमाणे यावर्षी मूर्ती विसर्जनातून होणाऱ्या प्रदूषणापासून बचावले आहे. गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडीचे डायरेक्टर सुहास गोडगे यांच्या संकल्पनेतून सर्व अधिकारी वर्गाने स्वयंप्रेरणेने परिश्रम घेऊन नदीकाठी विसर्जित झालेल्या सर्व गणेश मूर्तींचे संकलन करून नदीपात्रातील सखोल भागात विसर्जित करण्यात आले.

गोदावरी बायोरिफायनरीज लि. साखरवाडी येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता ही सेवा अभियान राबवले. याचाच एक भाग म्हणून गोदावरी नदीकाठी साचलेल्या सर्व मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. डायरेक्टर सुहास गोडगे यांनी सांगितले की सर्व नागरिकांनी शाडू मातीच्या गणपतीला विशेष पसंती दिली पाहिजे जेणेकरून गणपती विसर्जन झाल्यानंतर गणपती मूर्ती पाण्यात विरघळली जाईल जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.

यावेळी जनरल मॅनेजर प्रवीण विभूते, धनंजय मोरे, रायभान गायकवाड, संजयकुमार शिंदे, सौदागर कुलाल, बळवंत पाटील, दिपक पाठक, गोपिराज जंगम, नितीन पाटील, नितीन कुलकर्णी, सोमनाथ कुलथे, योगेश बागल, संजय कऱ्हाळे, सुरज वाणी, साईनाथ चव्हाण, गणेश पाटील, रवींद्र भोकरे, भारत उंडे, अंकुश गुडघे, अरुण बोरनारे, प्रशांत शिरसाठ, संदीप नरोडे, श्रीधर धमाळ, संदीप थोरात, मनीष ओसवाल, श्याम देवकर, देवेंद्र वाघ, संदेश गोडगे, राहुल काकडे तसेच अन्य अधिकारी व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. गोदावरी बायोरिफायनरीज लि. मधील अधिकाऱ्यांनी केलेल्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्थरातून कौतुक होत आहे.