शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : शेवगाव शहरातील दिव्यांग नागरिकाचे नाव नोंदणी अभियान आज दि. २६ पासून सुरू झाले असून ते
३१ जानेवारी २०२५ तारखे पर्यंत चालू राहणार आहे. शेवगाव नगरपरिषद कार्यालयामार्फत हे अभियान राबवले जाणार आहे.

तरी तमाम दिव्यांग बांधवांनी दिव्यांगाच्या लाभासाठी या कालावधीमध्ये कार्यालयीन सुट्टीचे दिवस सोडून ४० टक्यापेक्षा अधिक असलेल्या अपंगत्वाचे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय शेवगाव यांचे ऑनलाईन प्रमाणपत्राची साक्षांकित सत्यप्रत, तसेच उत्पन्नाचा दाखला, जातीचा, शाळा सोडलेला दाखला, जन्म दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, स्थानिक रहिवासी पुरावा इत्यादी कागदपत्राच्या सत्य प्रती शेवगाव नगर परिषदेच्या पंचायत समितीसमोरील जन्म मृत्यू विभागात द्यावेत असे आवाहन प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष गणेश हणवते यांनी केले आहे.
