कोपरगाव येथील बालकाच्या खुनाच्या तपासात पोलीसांना धागेदोरे सापडले 

अनैतिक संबंधातून पोटच्या मुलाचा खुन करणारी आई प्रियकरासह फरार

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ :  कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील गोदावरी नदीच्या पुलाखाली एका ४ वर्षाच्या बालकाचा मृतदेह पांढऱ्या कपड्याच्या गाठोड्यात बांधून फेकला होता.  हि घटना २० डिसेंबर रोजी उघडकीस आली माञ मयत मुलगा कोण आहे, तो कुठला आहे, त्यांचे पालक कोण आहेत, कोणत्या गावचा आहे, त्याचा खुन केला की अन्य काही कारणाने मृत्यू झाला अशा अनेक शंका कुशंका तालुक्यात सुरु असल्याने या बालकाच्या मृत्युचे गुढ उलघडणे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते.

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी व त्यांच्या सहकार्याने तपसाची चक्रे फिरवून अखेर खुन झालेल्या बालकाच्या नातेवाईकापर्यंत पोहचण्यात यशस्वी झाले. माञ खुनातील मुख्य सुञधारापर्यंत अजुनही पोहचण्यात अपेक्षित यश आले नसले तरीही मुलांच्या खुनात जन्म देणाऱ्या आईचा सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.

याबाबत पोलीस सुञाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत मुलाचे नाव कार्तीक ज्ञानेश्वर बदादे वय ४ वर्षे ३ महीणे असुन तो  साकुरेमिग ता. निफाड जि. नाशिक येथील असुन तो दिवाळी पासुन आपल्या सोबत रहात होता. मयत कार्तीकची ओळख पटली असुन त्याचा मृतदेह त्यांचे वडील ज्ञानेश्वर सुभाष बदादे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

माञ त्याची आई तीच्या प्रियकरासोबत गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. तीचा प्रियकर व ती कोपरगाव तालुक्यातील एका गावात शेतीकामासाठी मंजुर म्हणून काम करीत होते. दरम्यान दोघांच्या प्रेमात कदाचित कार्तीक अडसर ठरत असावा किंवा अन्य काही तरी कारणाने प्रियकर व खुद आई यांनी त्याचा खुन केला असावा असा प्राथमिक  अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.

खुन करुन कार्तीकची आई व तीचा प्रियकर दोघेही फरार असुन पोलीस त्या दोघांचा कसुन शोध घेत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून पोलीसांनी अथक परिश्रम घेवुन मयत बालकाच्या खुनाचे धागेदोरे हाती घेतले आहेत लवकरच त्या दोघांना पोलीस गजाआड करण्याची शक्यता आहे.  दरम्यान बालकाच्या खुनावरुन तर्कवितर्क लढवले जात होते त्याला काहींसा पुर्ण विराम मिळाला असला तरीही आरोपींना अटक केल्यानंतर अधिक माहीती पुढे येवू शकते.