वाढदिवसानिमित्त डॉ. संजय उबाळे कडून क्षयरोग रुग्णांना पौष्टिक आहार किटचे वाटप

राहाता प्रतिनिधी, दि. ९ : अखिल भारतीय प्रयोगशाळा वैज्ञानिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तसेच राहाता लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन  डॉ. संजय उबाळे यांनी सामाजिक दायित्व म्हणून राहाता ग्रामीण रुग्णालयातील क्षयरोग झालेल्या रुग्णांना प्रतिकार शक्ती वाढवली म्हणून २५ पौष्टिक आहार किटचे वाटप केले. 

  डॉ. संजय उबाळे हे प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता ग्रामीण रुग्णालयातील क्षयरोग रुग्णांना विविध प्रकारचे पौष्टिक खाद्य पदार्थाचे वाटप करतात यावर्षी देखील त्यांनी २५ रूग्णांना पौष्टिक आहारचे किराणा किट वाटप ग्रामीण रुग्णालयात करून सामाजिक उपक्रम केला.

या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.शुभांगी कान्हे, डॉ.संजय गायकवाड सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक, लायन्स क्लबचे उपाध्यक्ष राजेंद्र बांगार, ॲड. गोरख दंडवते, रवींद्र जोशी, दशरथ तुपे, विजय धनवटे, किरण वाबळे, डॉ शर्वरी कुलकर्णी, डॉ. अमोल लोणारे, संतोष भडांगे व आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी लायन्स क्लबचे अँड. दिनेश कार्ले, वेंकटेश अहिरे, जितू अहिरे, अंजली उबाळे, डॉ. लीना उबाळे, ॲड. संतोष घोडके, डॉ. पाचोरे मॅडम, सत्यावान कोल्हे, शेख आखिल, स्मिता मुरादे, सरला तायडे, योगेश धावणे, चंदू परदेशी, मीनाक्षी कांबळे, नयना सोनवणे व सर्व ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका वर्ग ४ कर्मचारी उपस्थित होते. बाळासाहेब गाडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार बनसोडे यांनी मानले.