माजी उपनगराध्यक्ष निखाडेंच्या आत्महत्येने कोपरगाव हादरले

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : कोपरगाव नगरपालीकेचे सर्वात तरुण माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याने संपूर्ण कोपरगाव हादरले . कोपरगावच्या किचकट  राजकारणात कमी वयात थेट उपनगराध्यक्ष पदापर्यंत मजल मारलेल्या उमद्या तरुणाने आत्महत्या का केली?. टोकाचे पाऊल उचलण्यासारख काय घडलं?. कोणत्या गोष्टीची कमतरता नसताना शिवाय एकुलता एक असलेल्या लाडल्या स्वप्निल निखाडेला आत्महत्या करण्यासारखी असाह्य काय झालं होतं ? या आणि अनेक प्रश्नांची मालीका कोपरगावकरांच्या मनात घोळत आहे.

 मंगळवारी दुपारी माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे हे शहरातील येवला रोड येथील एका हाॅटेलच्या परिसरात रस्त्याच्या कडेला आपल्या चारचाकी गाडीत विषप्राशन करुन निपचित पडल्याचे त्यांच्या जवळच्या मिञांना आढळून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून निखाडे यांना शहरातील मुळे हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेमाञ परिस्थितीत हाताबाहेर असल्याचे लक्षात आल्याने त्यांना नाशिक येथे पाठवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. नाशिक येथे  एका खाजगी हाॅस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार सुरू असताना निखाडे  यांनी गुरुवारी सकाळी जगाचा निरोप घेतला.

 निखाडे यांच्या मृत्युची बातमी कोपरगाव शहरासह तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. निखाडे  यांच्या निधनाने कोपरगावकरांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करुन शोक व्यक्त करण्यात आले.

 दरम्यान स्वप्निल निखाडे हे कमी वयात नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात भाजप अर्थात कोल्हे गटाकडून उतरले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांच्या सहकार्याने निवडूण आले. कोल्हेंनी  स्वप्निल निखाडे यांना उपनगराध्यक्ष करुन नव्या पिढीतील तरुणाईला राजकारणात मोठे पद देवून नवा विक्रम केला. निखाडे  कमी वयात उपनगराध्यक्ष होणारे पाहीले उपनगराध्यक्ष. 

नव्या  उमेदीचा नवा राजकारणी, उत्तम व्यक्तीमत्व अशी ओळख असलेले निखारे यांनी  कोल्हेंची साथ सोडून नुकतेच आमदार आशुतोष काळे यांना साथ देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे घड्याळ हातात बांधले.विधानसभेत  काळेंचा जोरदार प्रचार केला. आगामी निवडणुकीत भावी नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न रंगवणारे स्वप्निल निखाडे अर्धवट स्वप्न सोडून जगाचा कायमस्वरूपी निरोप घेतल्याने कोपरगावच्या  राजकीय, सामाजीक क्षेञात शोककळा  पसरली आहे.

 निखाडे  यांच्या निधनाबद्दल आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार अशोकराव काळे, संजीवनी उद्योग समुहाच्या अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, महाराष्ट्र राज्य महानंद दूध संघाचे माजी अध्यक्ष राजेश परजणे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केले.

Leave a Reply