कोपरगाव प्रीमिअर लीगच्या  ‘डे नाईट’ क्रिकेट स्पर्धेचा शिवसाई आदर्श संघ आमदार चषकाचा मानकरी

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ :  कोपरगाव येथील केबीपी विद्यालयाच्या भव्य मैदानावर भरविण्यात आलेल्या कोपरगाव प्रीमिअर लीगच्या  ‘डे नाईट’ क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना जिंकून शिवसाई आदर्श संघ आमदार चषकाचा मानकरी ठरला आहे.

Mypage

कोपरगाव प्रीमिअर लीग आमदार आशुतोषदादा काळे चषक २०२३ ‘डे नाईट’ क्रिकेट स्पर्धा हजारो क्रिकेटप्रेमींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात येवून पहील्या सामन्याची नाणेफेक त्यांच्या हस्ते करून स्पर्धेस प्रारंभ झाला. दिवस रात्र खेळल्या गेलेल्या या स्पर्धेतील सर्वच सामने अतिशय चुरशीचे झाले सर्वच सामन्यांना क्रिकेट शौकिनांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येवून विजेत्या संघांना रोख रक्कम व चषक प्रदान करण्यात आला.

Mypage

या स्पर्धेत कोपरगाव तालुक्यातील ८ संघ सहभागी झाले होते. त्यापैकी शिवसाई आदर्श संघ आमदार चषकाचा मानकरी ठरला आहे. बबन आण्णा वाजे प्रतिष्ठान संघाला द्वितीय तर सलीमभाई पठाण ११ संघाने तृतीय पारितोषिक  मिळविले. ‘मॅन ऑफ दि सिरीज’ व ‘बेस्ट बॉलर’ पुरस्कार पुणे येथील विशाल निघोट तर ‘बेस्ट बॅट्समन’ पुरस्कार मनमाड येथील मंसुफ शाह या खेळाडूस देण्यात आला.

Mypage

यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, चंद्रशेखर म्हस्के, अशोक आव्हाटे, धनंजय कहार, राजेंद्र खैरनार, पंकज पुंगळ, संतोष शेजवळ, बापू वढणे, राकेश शहा, श्रेणीक बोरा, विकि जोशी, अमोल गिरमे, संजय नळे, किरण बागुल, हिरामण पोटे, गोकुळ वायकर, प्रकाश वायकर, 

Mypage

निसार शेख, अजगर खाटीक, सादीक पेंटर, राहुल चवंडके, संतोष दळवी, स्पर्धेचे आयोजक दादा पोटे, राजेंद्र जोशी, रोशन शेजवळ, हाफिज शेख, अमोल वाघडकर, दिलीप पोटे, गोविंद वाकचौरे, मानव कोते, वसीम शेख, जुनेद खाटीक, शाहरुख पठाण, सिकंदर पठाण, शुभम जोशी, महेश साळवे, केदार साळवे, कैलास पोटे, अक्षय वायकर, अजय गोंडे, आदींसह सहभागी संघाचे खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *