शिर्डी प्रतिनिधी, दि. १४ : कोईबतोर तामिळनाडू येथील साईभक्त एस वाडीवेल यांच्याकडून साईचरणी साडेपाच लाखांची सोन्याची साखळी अर्पण. श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीत भरभरून दान देत असतात. मकर संक्रांतीच्या पुर्वसंध्येला १३ जानेवारी रोजी कोईंबतोर, तामिळनाडु येथील श्री एस. वाडीवेल या साईभक्ताने श्री साईचरणी ८० ग्रॅम वजनाची आकर्षक सुवर्ण साखळी अर्पण केली.
या साखळीची किंमत ५ लाख ७३ हजार ४३० रुपये आहे. ही सुंदर सुवर्ण साखळी साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. या प्रसंगी, श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री एस. वाडीवेल यांचा सत्कार केला.