शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : शहरात अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात नगर परिषदेने कारवाई सुरू केली आहे. रोहन गुलाबराव रोकडे रा. शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्यावर शेवगाव नगरपरिषदेचे कर निरीक्षक भाऊसाहेब जोगस यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता वीरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ कलम तीन प्रमाणे अनधिकृत बॅनर लावल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, रोहन रोकडे यांना नगरपरिषदे कडून बॅनर लावण्याची परवानगी देण्यात आली होती. तथापि त्यांनी परवानगी व्यतिरिक्त इतर ठिकाणी अनधिकृत बॅनर लावल्याने त्यांच्या विरोधात नगरपरिषदेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण अजिनाथ शिरसाट महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका शिरसाट पुढील तपास करत आहेत.