महिलांच्या आर्थिक समृद्धीसाठी ‘श्री रेणुकामाता’ प्रयत्नशील – जयंती भालेराव

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : लाखो खातेदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या श्री रेणुकामाता मल्टीस्टेट या  संस्थेच्या वतीने गुंतवणूकदार, व्यावसायिकांसाठी उत्तम बँकिंग सेवा देण्यासोबतच जेष्ठ व विधवा महिलांसाठी ठेवीवर अधिक व्याजदर देत असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व समृद्ध करण्यासाठी संस्था सदैव  प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीच्या संचालिका जयंती प्रशांत भालेराव यांनी केले.

संस्थेचे  मुख्य कार्यालय असलेल्या नगर येथील रेणुकाभवनात  मकरसंक्रातीनिमित्त हळदी-कुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासोबत प्रयास ग्रुप, दादी-नानी ग्रुप व सुरभि हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच महिलांसाठी विविध खेळ घेऊन बक्षिसे देण्यात आली. या  कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी  त्या बोलत होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे तज्ञ संचालक व सुरभि हॉस्पिटलचे चेअरमन अनिरुद्ध देवचक्के होते. यावेळी व्यासपीठावर सुरभि हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. वैभव अजमेरे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुलभा पवार, लोकमतचे सरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश, प्रयास ग्रुपच्या संस्थापिका अलका मुंदडा, अध्यक्षा रजनी भंडारी, दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्ष जया गायकवाड, रेणुका भालेराव आदी उपस्थित होते.            यावेळी  भालेराव यांनी श्री रेणुका मल्टी स्टेट संस्थेत  महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

अध्यक्षपद देवचक्के म्हणाले, श्री रेणुकामाता मल्टीस्टेट व सुरभि हॉस्पिटल परिवाराने प्रयास ग्रुप व दादी-नानी ग्रुपच्या माध्यमातून महिलांना संक्रातीचे वाण देण्यासोबतच आरोग्याचेही वाण देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. आजच्या धकाधकीच्या युगात महिला अनेक आजार अंगावर काढून दवाखान्यात जाण्याचे टाळतात. म्हणूनच हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

      डॉ. सुलभा पवार यांनी महिलांनी त्यांच्या आरोग्यविषयी घ्यावयाची काळजी विषयी सविस्तर माहिती दिली व महिलांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी उपस्थित महिलांची मोफत तपासणी करण्यात आली व इतर खर्चिक तपासण्या अत्यंत सवलतीच्या दरात करण्यात येणार असल्याचे सांगितले.   

यावेळी विद्या बडवे, आरती कोकाटे यांचीही भाषणे झाली.  वैष्णवी रासकर यांनी स्वागत केले. श्री रेणुकामाताचे कायदेशीर सल्लागार, सुरभि हॉस्पिटलचे संचालक ॲड. गणेश शेंडगे यांनी सुत्रसंचलन केले, तर मोनिका गाडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेघना मुनोत, उषा सोनी, रेखा फिरोदिया, जयश्री कुऱ्हे, लीला अग्रवाल, वरिष्ठ व्यवस्थापक कार्तिक पुनगंटीवार आदींनी परिश्रम घेतले.