शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : विजेचा तुटवडा असल्याने वाढत्याविजेच्या मागणीवर मात करण्यासाठी सरकार सौर ऊर्जेला प्रोत्साहन देत आहे. घरगुती व औद्योगिक कारखान्या बरोबरच शेतकरी देखील कृषी पंपाला सौर ऊर्जाची उपकरणे बसवून प्रतिसाद देत आहेत.

तथापि या परिसरात कार्यरत असलेल्या सिग्मा एनर्जी सौरपंप या संस्थे कडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. स्थानिक डीलर तर ग्राहकांची भेट ही घेत नाही व त्यांच्या दूरध्वनीवरील चौकशीला देखील कधीच उत्तर देत नाही. परिसरातील अन्य सोलर कंपन्या पैसे भरल्या नंतर लगेच सोलर बसवून देतात.

पैसे गुंतवून देखील प्रतिसाद न देणाऱ्या यंत्रणेला जाब विचारावा शेतकऱ्यांना न्याय द्यावा व शेतकऱ्यांचीही अडचण त्वरित सोडवावी अन्यथा नाईलाजाने आंदोलन करावे लागेल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष सतीश मगर यांनी तहशीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.

निवेदनावर तालुका अध्यक्ष सतीश मगर, संतोष पटवेकर, महादेव निळ, सचिन दळवी, किरण मगर, अमोल आहेर, रवी शिंदे, शिवम तिजोरे, स्वप्निल कसबे आदींच्या सह्या आहेत.
