शेवगावात अनाधिकृत मुरूमाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : शेवगाव तालुक्यातील आखेगाव तसेच पाथर्डीच्या  कोरडगाव येथील नाणी नदीलगतग रस्त्याचे काम सूरू असताना तेथे अनाधिकृत मुरुमाची वाहतूक करणारी दोन वाहने शेवगाव तहसीलच्या पथकाने पकडून त्या वाहन चालकावर कारवाई केली आहे.

वाहन क्र. एम एच – १४ बी जे – १०४० चे मालक दत्तात्रय हरिश्चन्द्र लांडे व वाहन क्र.एम एच -१२ , ४८७४ चे मालक  संभाजी जायभाय व चालक सोमनाथ नवनाथ खेडकर यांचेकडे कारवाई करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता दोन्हीही वाहनधारकाकडे  व वाहतूक करण्याबाबतचा गौणखनिजचा कुठलाही परवाना आढळून आला नसल्याने दोन्ही वाहने आणून तहसीलच्या आवारात लावून त्यांचा रीतसर पंचनामा करण्यात आला.

या वाहनात प्रत्येकी दोन ब्रास मुरूम आहे. तहसीलदार प्रशांत सांगडे यांचे मार्गदर्शनाखाली शेवगावचे मंडळाधिकारी विष्णू खेडकर, लाडजळगावचे , तलाठी सोमनाथ आमने, चापडगावचे तलाठी पी एम ढाकणे व शेवगावचे तलाठी भूपेंद्र अंधारे, राहुल काळोखे यांचे पथकाने ही कारवाई केली.