शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शेवगाव पंचायत समिती मार्फत तालुक्यातील १६ मागासवर्गीय भागातील अंगणवाड्यांना एक खास उपहार देण्यात आला. गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर यांच्या प्रेरणेने या अंगणवाड्यांना विविध प्रकारची खेळणी असलेले विशेष किट देण्यात आले.

या किटमध्ये लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक असणारी बाराखडी, एबीसीडी, पाढे, फळझाडे व विविध खेळाचे साहित्याचा समावेश आहे. यासाठी श्रीराम चव्हाण, वसंत जगधने, शैलेश बोंदरडे आणि बाळासाहेब खुळे यांनी विशेष योगदान दिले. पंचायत समितीच्या या उपक्रमामुळे मागासवर्गीय भागातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाची मदत होणार असल्याच्या भावना आंगणवाडी सेविकांनी यावेळी व्यक्त केल्या.
